Nagrota Encounter : कमांडो ट्रेनिंग घेऊन दहशतवादी घुसले भारतात, 30 KM चालत केला प्रवास

Nagrota Encounter : कमांडो ट्रेनिंग घेऊन दहशतवादी घुसले भारतात, 30 KM चालत केला प्रवास

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी सुमारे अडीच तास पायी भारताच्या सीमेवर पोहोचले.

  • Share this:

नगरोटा, 22 नोव्हेंबर : जम्मूमधील नगरोटा परिसरात गुरुवारी झालेल्या चकमकीसंदर्भात नवीन खुलासे समोर येत आहेत. 26/11 ला मोठा हल्ला करण्याचा कट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. हा कट सुरक्षा दलानं उधळून लावला होता. आता या प्रकरणी दोन मोठे खुलासे समोर आले आहेत. एक म्हणजे दहशतवादी पाकिस्तानातील दहशवाद्यांच्या म्होरक्यासोबत संपर्कात होते. त्यांच्याकडे सापडलेल्या वस्तू या पाकिस्तानमधून तयार करण्यात आलेल्या होता. दुसरा खुलासा म्हणजे दे दहशतवादी घुसले कसे? याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जम्मूच्या नगरोटा येथे गुरुवारी एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या जैश-ए-मोहम्मदच्या चार पाकिस्तानी दहशतवाद्यांविषयी नवीन माहिती मिळाली आहे. पठाणकोट येथे 2016च्या हवाई हल्ल्याचा मुख्य आरोपी जैश-ए-मोहम्मद (जेएम) चा ऑपरेशनल कमांडर कासिम जान हा देखील या संपूर्ण षडयंत्रात सहभागी होता. अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार दक्षिण काश्मीरमध्ये कासिमचे बरेच सैनिक आहेत, जे त्याच्या इशाऱ्यावर कोणतीही घटना घडवून आणण्यास तयार आहेत. कासिम हा भारतातील जैश दहशतवाद्यांचा मुख्य कमांडर आहे आणि दहशतवादी मुफ्ती रऊफ असगर याच्याशी त्याचा थेट संबंध असल्याचंही समोर आलं आहे.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानातून अमेरिकेनं आपलं सैन्य हटवल्यानंतर जैश ए मोहम्मदच्या काश्मीरमध्ये पुन्हा कुरापती सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 14 विशेष प्रशिक्षण दिलेल्या दहशतवाद्यांना गुजांवाला मार्गानं भारतात घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गुप्तचर विभागानं दिलेल्या माहितीनुसार जैश एच्या चारही दहशतवाद्यांना विशेष ट्रेनिंग देण्यात आलं होतं. ठार करण्यात आलेले दहशतवादी शकरगाह इथून सांबा सीमा ओलांडून 30 किलोमीटर पायी चालत आले होते. त्यानंतर जटवाल स्थित पिककअप पॉइंटवर पोहोचले अमावास्येच्या रात्रीत काळोखाचा फायदा घेऊन या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचा-कानात इअरफोन लावून रेल्वे ट्रॅकवर चालत होते तरुण; अपघातात दोघांचाही मृत्यू

अडीच तास चालून सीमेवर केली घुसखोरी

सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी सुमारे अडीच तास पायी भारताच्या सीमेवर पोहोचले. दहशतवाद्यांचा संभाव्य मार्ग रामगड ते हिरानगर सेक्टरमधील सांबा सेक्टरमधील मावा गाव असल्याचे सांगण्यात येत आहे. तिथून नानाथ नाल्याजवळील कच्च्या रुळावरून सीमेवर पोहोचले. त्यानंतर रात्री 3 वाजेपर्यंत हे दहशतवादी ट्रकमधून फिरत होते. साधारण 4.30 च्या आसपास जम्मू इथल्या नगरोटा टोल नाक्याजवळ आले. तिथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 22, 2020, 11:56 AM IST

ताज्या बातम्या