नवी दिल्ली: जम्मू-कश्मीर (Jammu Kashmir) च्या नगरोटा (Nagrota) इथे सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत 4 दहशतवादी ठार झाले होते. सुरक्षा दलांच्या या काराईचं पंतप्रधानांनी कौतुक केलं आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानचा डाव उधळला गेल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पाकिस्तानला सज्जड दमही दिला आहे. पाकिस्तानचे हे दुष्ट मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. नगरोटा इथल्या कारवाईनंतर पंतप्रधानांनी आज उच्चस्तरीय बैठक घेऊन सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.
पंतप्रधानांच्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि गुप्तचर संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. मुंबईवरच्या 26/11 दहशतवादी हल्ल्याला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. पार्श्वभूमीवर मोठा हल्ला घडविण्याचा या दहशतवाद्यांचा डाव होता. हा डाव सुरक्षा दलांनी उधळून लावल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. पाकिस्तानमध्ये असलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या 4 जणांचा खात्मा करणं ही सुरक्षा दलांची मोठी कामगिरी असल्याचंही ते म्हणाले.
नगरोटा (Nagrota incidence) इथे मारले गेलेले दहशतवादी काही ठराविक उद्देशाने सीमेपलीकडून भारतात घुसवण्यात आले होते, याबद्दलचा मोठा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घेतलेल्या एका बैठकीत करण्यात आला. नगरोटाची घटना बॉर्डर ग्रीड रणनीचं (Border Grid) यश मानलं जात आहे. हे अतिरेकी तिथे मारले गेले नसते तर देशात त्यांनी हाहाकार उडवला असता.
Our security forces have once again displayed utmost bravery and professionalism. Thanks to their alertness, they have defeated a nefarious plot to target grassroots level democratic exercises in Jammu and Kashmir.
— Narendra Modi (@narendramodi) November 20, 2020
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरोटा घटनेनंतर त्याबद्दल सविस्तर चर्चा आणि विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सुरक्षा यंत्रणेतले महत्त्वाचे गुप्तचर, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा (NSA) आणि गृहमंत्री (HM), परराष्ट्र सचिव (Foreign Secretary) यांची एकत्रित बैठक घेतली. त्यामध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अतिरेकी सीमेपलीकडून भारतावर मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या उद्देशाने आले होते. 26/11 च्याच दिवशी पुन्हा एकदा तशीच खळबळ उडवून देण्याचा त्यांचा प्लॅन होता. सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे तो उद्ध्वस्त झाला.