Nagarota Encounter: पाकिस्तानमधून बोगद्यातून आले होते दहशतवादी, पाहा खळबळजनक VIDEO

30 ते 40 मिटर लांब हा बोगदा असून त्यातून दहशतवादी आले होते. स्थानिक नागरिकाने त्यांना मदत करून हायवे पर्यंत आणलं असावं अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

30 ते 40 मिटर लांब हा बोगदा असून त्यातून दहशतवादी आले होते. स्थानिक नागरिकाने त्यांना मदत करून हायवे पर्यंत आणलं असावं अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

  • Share this:
    श्रीनगर 22 नोव्हेंबर: नगरोटा एन्काउंटर नंतर जैश ऐ मोहम्मदच्या दहशतवाद्यांची धक्कादायक माहिती उघड झाली होती. मोठा हल्ला घडवून आणण्यासाठी या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून पाठविण्यात आले होते. हे दहशतवादी सीमेवर पाकिस्तानमधून बोगद्यातून आले होते असा संशय व्यक्त केला जात आहे. सांबा विभागात अशा प्रकारचा एक बोगदा आढळून आला आहे. सीमा सुरक्षा दलाचे IG एनएस जामवाल यांनी ही शक्यता व्यक्त केलीय. या आधीही अशाच प्रकारचे बोगदे सीमेवर आढळून आले होते. 19 नोव्हेंबरला झालेल्या चकमकीत जैश चे 4 दहशतवादी ठार झाले होते. 30 ते 40 मिटर लांब हा बोगदा असून त्यातून दहशतवादी आले होते. स्थानिक नागरिकाने त्यांना मदत करून हायवे पर्यंत आणलं असावं अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. काश्मीरमधल्या दहशतवाद्यांना पाकिस्तान मदत करतो ही बाब आता काही नवीन राहिलेली नाही. या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं, आर्थिक मदत करणं आणि शस्त्र पुरवठा करण्याचं काम पाकिस्तान गेली कित्येक दशके करत आहे. पाकिस्तानचा एक आणखी डाव भारतीय सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तान काश्मीरातल्या दहशतवाद्यांना शस्त्र पुरवठा करतो हे स्पष्ट झालं असून लष्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. Tunnel used by Pakistani Jaish e Muhammad terrorists to infiltrate into India across the International Border in the Samba Sector of Jammu & Kashmir. Tunnel found by security forces at BOP Regal. pic.twitter.com/D7GBwMFRuu या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पाकिस्तानमधून या दहशतवाद्यांना राजौरी जिल्ह्यातल्या दुर्गम भागात ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे पाठविण्यात आली होती. ती शस्त्रे आणण्यासाठी हे दहशतवादी निघाले होते त्यांना अटक करण्यात आली होती. दक्षिण कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातले ते रहिवासी असून राहिल बशीर, आमिर जान आणि हाफिज युनिस अशी त्यांची नावे आहेत.
    जप्त केलेल्या शस्त्रसाठ्यात 2 एके-56 रायफल्स, 180 राउंड, 6 एके-मॅगझीन्स, दोन चिनी पिस्तुल, 30 राउंडसोबतच तीन पिस्तुल मॅगझीन्स आणि चार ग्रेनेड एवढा शस्त्रसाठा आहे. त्याच्यासोबतच 1 लाख रुपये रोखही जप्त करण्यात आली होती.
    Published by:Ajay Kautikwar
    First published: