लग्नानंतरच ताटातूट, नागपूरच्या युवकाची पत्नी अडकली पाकिस्तानात

नागपूरच्या एका तरुणाचं पाकिस्तानातल्या एका मुलीशी लग्न झालं. मात्र त्यानंतर तिला व्हिसाच मिळाला नसल्यानं नवरा- नवरीची लग्नानंतर भेटच होऊ शकली नाही.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 06:41 PM IST

लग्नानंतरच ताटातूट, नागपूरच्या युवकाची पत्नी अडकली पाकिस्तानात

प्रशांत मोहिते 1 नोव्हेंबर : भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावाचा परिणाम दोन्ही देशांच्या संबंधांवर जसा झाला तसाच तो दोन्ही देशांच्या लोकांच्या परिणामांवरही झालाय. दोन्ही देशांमध्ये जेव्हा तणाव निर्माण होतो तेव्हा त्याचा पहिला फटका बसतो तो सामान्य लोकांना. पंजाब आणि काश्मीरमधल्या अनेक लोकांचे पाकिस्तानात नातेवाईक राहतात. त्याचबरोबर फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून भारतात आलेल्या लोकांचेही नातेवाईक पाकिस्तानात आहे. नागपूरात राहणाऱ्या नागपाल कुटुंबाला या तणावाचा फटका बसलाय. नागपूरच्या एका तरुणाचं पाकिस्तानातल्या एका मुलीशी लग्न झालं. मात्र त्यानंतर तिला व्हिसाच मिळाला नसल्यानं नवरा- नवरीची लग्नानंतर भेटच होऊ शकली नाही.

जय हो...रोहित पवारांसाठी 28 जेसीबींमधून उधळला गुलाल!

नागपूरच्या विशाल नागपाल या तरुणाचं पाकिस्तानातल्या अंजली कालरा या मुलीशी गेल्या वर्षी लग्न झालं. हे लग्न अंजलीच्या गावी सिंध प्रांतात झालं. आता लग्नाचा वाढदिवस जवळ येतोय मात्र तिला व्हिसाच मिळत नाहीये. अंजलीने एका व्हिडीओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्हिसा देण्याची विनंती केलीय.

विशाल आणि अंजलीचं  24 नोव्हेंबर 2018 पाकिस्तानच्या जेकामाबाद येथे लग्न झालं होतं. नागपाल कुटुंबीय या लग्नासाठी पाकिस्तानात गेलं होतं. मात्र येताना नवरीचा व्हिसा काही मिळालाच नाही. लग्न करून नवरदेव वऱ्हाडी मंडळीसह परत आला. आता व्हिसा मिळेल नंतर मिळेल असा करता करता वर्ष लोटलं पण अंजली काही नागपूरला आलीच नाही.

...तर महाराष्ट्रात लागू शकते राष्ट्रपती राजवट - मुनगंटीवार

Loading...

पठाणकोट, उरीचा हल्ला, त्यानंतरही भारताची बालाकोटची करावाई यामुळे गेली काही वर्ष दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. या ताणावामुळे दोन्ही देशांच्या सरकारांनी जे निर्णय घेतले त्यामुळे नागरिकांनाही फटका बसला. पंजाबमधून काही ट्रेन्स पाकिस्तानात जातात. तर दिल्लीतून बस लाहोरला जाते. मात्र या तणावामुळे यातल्या जवळपास पूर्णच सेवा ठप्प झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2019 06:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...