S M L

नागपुरात मुसळधार, विधान भवनात लावला जनरेटर, कामकाज रद्द

अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. विधान भवनातील वीज गेलीय. विरोधकांचं अंधारात आंदोलन सुरू आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jul 6, 2018 11:30 AM IST

नागपुरात मुसळधार, विधान भवनात लावला जनरेटर, कामकाज रद्द

नागपूर, 06 जुलै : नागपूरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. विधान भवनातील वीज गेली होती. त्यामुळे विधान भवनात आता जनरेटर लावलाय. पण आजचं कामकाज रद्द केलंय.

हेही वाचा

अफवांचे प्रकार रोखण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपवर आता पोलिसांची करडी नजर५६ इंच छातीपेक्षा, छातीवर किती मेडल आहेत त्याला अधिक महत्त्व- उद्धव ठाकरे

सट्टेबाजीला अधिकृत करण्याची विधी आयोगाची शिफारस

पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आजचा दिवस ही वादळी ठरण्याची शक्यताय. विधान सभेत सिडको नवी मुंबई जमिन प्रकरणावरून मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते याच्यात आरोपप्रत्यारोप झाले. याच मुद्दावरून परत विरोधक मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची कोंडी करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय तूर खरेदीमधला सरकारी हलगर्जीपणा, दूध व्यवसाय समस्या, डिजिटल इंडिया पोलखोल यांवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची शक्यता, तर दुसरीकडे विधान परिषदेत पुन्हा विरोधक कृषी विषयावरून सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याची शक्यता आहे. विदर्भात कापसावर आलेली बोंड अळी आणि सरकारकडून केलेली मदत यांवर विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्याची शक्यता आहे.

Loading...
Loading...

विधान परिषदेत नाणार प्रकल्पावर खास चर्चा विरोधी पक्षांनी मागितली आहे. तसच महामार्गावरील माॅल्समध्ये कमाल किंमतीपेक्षा जास्त दराने वस्तू विक्री यांवर लक्षवेधी आहे. पावसाळी अधिवेशन दुसर्या दिवशी विधानसभा आणि विधान परिषद कामकाज काहीच झाले नाही दोन्ही सभागृह कामकाज दिवसभर तहकूब झाल. विधानसभेत ही पुन्हा सिडको जमीन या विषयावरून विरोधक सत्ताधारी पक्षाची कोंडी करणार का याकडे लक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2018 10:26 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close