Home /News /national /

पोलीस ठाण्यात वर्दीत सुरू होता नागीन डान्स; VIDEO पाहून नागरिक संतापले

पोलीस ठाण्यात वर्दीत सुरू होता नागीन डान्स; VIDEO पाहून नागरिक संतापले

आता पोलिसांनीच हा प्रताप केल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे

    ओडिसा, 9 एप्रिल : देशभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे (Corona Second Wave) सध्या अनेक ठिकाणी निर्बंध लादण्यात आले आहेत. सर्वसामान्य जनता नियम, बंधनं आणि कोरोना संकटाच्या भयानं हतबल झाली आहे. झपाट्यानं वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, प्रशासन यांच्यावर ताण वाढत आहे. तर जनता उद्याच्या काळजीनं भयग्रस्त आहे. पुन्हा टाळेबंदी होणार नाही ना, याची काळजी जनतेला आहे. नुकत्याच झालेल्या होळीच्या सणावरही यामुळे कडक निर्बंध घालण्यात आले होते. होळी(Holi), धुळवड, रंगपंचमी या सामुहिक रित्या जल्लोषात साजरे होणारे सण घरच्याघरी साजरे करण्याचे आदेश प्रशासनानं आधीच जारी केले होते. जनतेनंही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून होळीसारखा मोठा सण घरच्याघरी साधेपणानं साजरा केला. अशा परिस्थितीत ओडिशातील पोलिसांच्या वर्तनानं मात्र सर्वसामान्य जनतेला उद्विग्न केलं आहे. होळीच्या दिवशी ओडिशातील(Odisha)एका पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी पोलिस ठाण्यातच(Police Station)चक्क रंग लावून नाचत होते. होळीचा आनंद साजरा करत होते. त्यांच्या नाचाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून पोलिसांच्या या वर्तनाबाबत जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. इथल्या स्थानिक लोकांनी नाराजी व्यक्त करत या पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे. या व्हिडिओबाबत राज्य पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे ही वाचा-Indian idol 12 ला Covid-19 ने ग्रासलं; आदित्य नारायणनंतर आता स्पर्धकालाही कोरोना आजतक डॉट इननं दिलेल्या वृत्तानुसार,हा व्हिडिओ ओडिशातील जाजपुर जिल्ह्यातील पानीकोईली पोलिस ठाण्यातील आहे. या व्हिडिओत,वर्दीत(Uniform)असलेले पोलीस कर्मचारी एकमेकांना रंग(Color)लावत, नाचत असून नागीन डान्स(Nagin Dance) करत असल्याचं दिसत आहे. यात एका होमगार्डमधील (Home Guard) महिला कर्मचारीही वर्दीत नाचताना दिसत आहे. हे पोलिस कर्मचारी होळीच्या दिवशी या परिसरात आयोजित मिलन समारंभात(Milan Functin)कर्तव्य बजावून पोलिस ठाण्यात परत आले होते. पोलिस ठाण्यात येताच त्यांनी एकमेकांना रंग लावत, नाचायला सुरुवात केली. काहीनी नागीन डान्सही केला. आपण कुठे आहोत याचं भानही त्यांना उरलं नव्हतं, असं या व्हिडिओवरून दिसतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होळीचा सण साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या होत्या. सार्वजनिक ठिकाणी सामूहिकरीत्या होळी पेटवण्यासही बंदी घालण्यात आली होती. पोलीस या नियमाची अंमलबजावणी होते की नाही हे काटेकोरपणे तपासत होते. जरा काही कसूर दिसली तरी कायद्याचा बडगा उगारला जात होता. अशा पार्श्वभूमीवर कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांचे सध्याच्या गंभीर परिस्थितीतील हे विसंगत वर्तन जनतेत असंतोष निर्माण करणारं ठरलं आहे. पोलिसांच्या या वर्तनानं ओडिशाच्या राज्य पोलिस दलाची मान शरमेनं खाली गेली आहे.
    First published:

    Tags: Odisha, Police

    पुढील बातम्या