तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोल टाकून केली बेदम मारहाण, Video पाहून राहुल गांधीही संतापले

तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोल टाकून केली बेदम मारहाण, Video पाहून राहुल गांधीही संतापले

युवकाला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोल टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

नागौर, 20 फेब्रुवारी : चोरीचा आरोप करत मोटारसायकल एजन्सीमध्ये तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गावातील काही समाजकंटकांनी आधी युवकाला बेदम मारहाण केली आणि नंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोल टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा सर्व प्रकार राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील पांचौड़ी परिसरात घडला आहे.

युवकाला अमानुष करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानतंर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसंच पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचल्यानंतर तातडीने कारवाई सुरू झाली असून पीडित तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार भींव सिंह, आईदान सिंह, आसू सिंह, सवाई सिंह, लक्ष्मण सिंह, हनुमान सिंह आणि गणपतराम या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच बुधवारी रात्री सर्व आरोपींना अटक करण्यात आली.

भावासमोर तरुणाला अमानुष मारहाण

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपींचा क्रूर चेहरा समोर आला आहे. आरोपींनी आधी युवकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर बेल्ट आणि तारेच्या साहाय्याने हल्ला चढवला. एवढं करूनही त्यांचं मन भरलं नाही आणि एका-एका आरोपीने पीडित तरुणाला पाणी पाजत पुन्हा मारहाण केली. घटना घडत असताना पीडित तरुणाचा भाऊ तिथं होता. आरोपींनी तरुणाच्या भावालाही मारहाण करत बाजूला बसवलं.

तरुणाने हतबल होऊन हात जोडले, पण आरोपींना पाझर फुटला नाही...

अमानुष मारहाण असह्य झाल्यानंतर पीडित तरुणाने हात जोडले, पण तरीही आरोपींनी त्याला मारणं थांबवलं नाही. अखेर पीडित तरुणाची प्रकृती जास्तच खराब झाल्यानंतर त्याच्या शेजाऱ्यांना फोन करण्यात आला आणि नंतर उपचारासाठी नेण्यात आलं. या सर्व घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजस्थानमध्ये खळबळ उडाली असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

First published: February 20, 2020, 4:03 PM IST

ताज्या बातम्या