नागौर, 20 मार्च : आम्ही तुमच्यासाठी नेहमीच अद्भूत गोष्टींची माहिती घेऊन येत असतो. आज न्यूज 18 तुम्हाला अशाच एका तलावाविषयी सांगणार आहे, जो पूर्वी संतांच्या आशीर्वादाने भरलेला असायचा. नागौरच्या रोल शहराजवळ हा अलनाव तलाव आहे, जो संतांच्या तपश्चर्येसाठी प्रसिद्ध होता. आजही तिथे साधूंनी तपश्चर्या केलेली झोपडी अस्तित्वात आहे. नागौरच्या या तलावाशी संबंधित एक रंजक कथा सांगितली जाते. या तलावाशी साधूंचं मोठं महत्त्व असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या तलावाचे बांधकाम 500 वर्षांहून अधिक जुने आहे.
तलावाला 500 वर्षांचा इतिहास
या तलावाचे बांधकाम 500 वर्षांहून अधिक जुने असल्याचे ग्रामस्थ चुनाराम यांनी सांगितले. हा तलाव अरणाकाम बिंजारा यांनी बांधला होता. या तलावाबरोबरच आणखी तीन गावांमध्ये नाले बांधण्यात आले होते. गावकरी सांगतात की रोल आणि बुगराडा या गावाच्या सीमेवर (काकर) बिंजारांनी व्यवसाय करण्यासाठी येथे मुक्काम केला होता. तेथे पाण्याची सोय नसल्यामुळे तलाव बांधण्यात आला आणि हा तलाव आलनाव तलाव म्हणून ओळखला जाऊ लागला. यानंतर साधू-संतांचे हे तपस्थान बनले होते.
वाचा - गुढी उभारताना काठी, रेशमी वस्त्र, कडूलिंब, बत्ताशाची माळ याचाच वापर का केला जातो
ऋषीमुनींशी संबंधित तलावाचे रहस्य
या तलावाबाबत संतांचा मोठा इतिहास आहे. संत लक्ष्मण दास आणि मुरखदास यांनी येथे तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. गावकऱ्यांच्या माहितीनुसार, जेव्हा गावात दुष्काळ पडला होता, तेव्हा लक्ष्मणदासजींच्या चमत्कारामुळे अलनाव तलाव फक्त एका हंड्याच्या पाण्याने पुन्हा भरला. प्राचीन काळी हा तलाव आजूबाजूच्या 5-6 गावांची तहान भागवत असे.
सद्यस्थितीत तलाव ताहनलेला
पाचसहा गावांची तहान भागवणाऱ्या या ऐतिहासिक तलावालाच सध्या पाण्याची नितांत गरज आहे. या तलावाच्या घाटावर साधूंच्या झोपड्या आणि बाबा रामदेव यांचे मंदिर बांधले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: History