कोहिमा 3 जुलै: चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर तिथे काय काय खाल्लं जाते याचे VIDEO व्हायरल झाले होते. चीनमध्ये विविध प्राणी आणि पक्षांचं मांस मोठ्या प्रमाणावर खाल्लं जातं. भारतातही पूर्वेतल्या काही राज्यांमध्ये कुत्र्यांचं मांस खाल्लं जातं. मात्र आता नागालँड सरकारने राज्यात अशा प्रकारचं मांस विकण्यास बंदी घातली आहे. Nagaland Government ban dog meat कुत्र्यांची खरेदी-विक्री करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
राज्याचे मुख्य सचिव तेमजेन तॉय (Temjen Toy) यांनी ही माहिती दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करायला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. पूर्वेतल्या अनेक राज्यांमध्ये कुत्र्यांचं मांस हे उच्च प्रोटिन असलेलं समजलं जातं. त्यामुळे लोक ते मांस खातात.
मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने त्याकडे संशयाने पाहिलं जात होतं. काही दिवसांपूर्वीच कुत्र्याला क्रुरपणे मारतानाचा VIDEOसुद्धा व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेक प्राणीप्रेमी संघटनांनी त्या विरुद्ध आवाज उठवला होता.या सगळ्या घटनानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
हात चेहऱ्याजवळ जाताच वाजणार अलार्म; NASAचं उपकरण कोरोनाला दूर ठेवण्यात मदत करणार
नागालँडमध्ये कोरोना व्हायरसचे नवे 34 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पूर्वेतल्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 535 झाली आहे. तर आसाममध्ये राजधानी गुवाहाटीत पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आलाय. रुग्णांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
क्वारंटाइन सेंटरमध्ये सुरू होतं सेक्स रॅकेट, शेकडो लोकं निघाली कोरोना पॉझिटिव्ह
गेल्या 24 तासांत राज्यात 6364 नवीन कोरोना रुग्ण सापडले. तर दिल्लीत 2373. तामिळनाडुमध्ये 4343, उत्तर प्रदेश 817, पश्चिम बंगाल 649, राजस्थान 350 आणि पंजाबमध्ये 120 रुग्ण सापडले. ही आकडेवारी चिंता वाढवणारी असली तरी, भारतात निरोगी रुग्णांची संख्या दिलासा देणारी आहे. भारताचा रिकव्हरी रेट 60% झाला आहे.
संपादन - अजय कौटिकवार