भाजप नेत्याचा असाही विजयी जल्लोष, बाल्कनीतून उधळल्या नोटा !

भाजप नेत्याचा असाही विजयी जल्लोष, बाल्कनीतून उधळल्या नोटा !

एच खेहोवी यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि जिंकली. 52 वर्षांचे खेहोवी हे भाजपचे श्रीमंत उमेदवार आहे

  • Share this:

05 मार्च : नागालँड विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. पण या विजयाची भाजप नेत्यांच्या डोक्यात हवा गेल्याचं चित्र समोर आलंय. एका भाजप नेत्याने आपल्या घराच्या बाल्कनीतून चक्क नोटा उधळल्यात. नोटा उधळल्यानंतर लोकांची एकच झुंबड उडाली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय.

ही घटना नागालँड येथील जुन्हेबोटा जिल्ह्यात घडलीये. भाजपचे विजयी उमेदवार एच खेहोवींवर नोटा उधळण्याचा आरोप आहे. एच खेहोवी यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि जिंकली. 52 वर्षांचे खेहोवी हे भाजपचे श्रीमंत उमेदवार आहे. खेहोवी हे आधी सरकारी कर्मचारी होते.  निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपला खासगी व्यवसाय सुरू केला त्यानंतर राजकारणात उडी घेतली.

3 मार्चला झालेल्या मतमोजणीत नागालँडमध्ये भाजप पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करणार आहे. भाजप नॅशनलिस्ट डेमोक्रेटिक प्रोगेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) चा पाठिंबा घेऊन भाजप सरकार स्थापन करणार आहे. भाजप आणि एनडीपीपी युतीला 29 जागांवर विजय मिळवलाय. तर एका जागा जिंकलेल्या जेडीयू आणि एक अपक्ष उमेदवार भाजपला पाठिंबा देणार आहे.

विजयाचा जल्लोष साजरा करत असताना खेहोवी यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी भारावून गेलेल्या खेहोवी यांनी कार्यकर्त्यांना नोटांची उधळण केली. त्यानंतर नोटा गोळा करण्यासाठी कार्यकर्त्यांचा एकच गोंधळ उडाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2018 07:09 PM IST

ताज्या बातम्या