अयोध्येतल्या राम मंदिरावरून नदवी आणि अमरनाथ मिश्रा यांच्यात आरोप-प्रत्यारोप

अयोध्येतल्या राम मंदिरावरून नदवी आणि अमरनाथ मिश्रा यांच्यात आरोप-प्रत्यारोप

मौलाना सलमान हसन नदवी यांनी अयोध्येतच आणखी एक मशीद बांधण्यासाठी जमीन, पैसे आणि राज्यसभा सदस्यत्वाची मागणी केली होती असा आरोप अमरनाथ मिश्रा यांनी केलाय.

  • Share this:

15 फेब्रुवारी :  मौलाना सलमान हसन नदवी यांनी अयोध्येतच आणखी एक मशीद बांधण्यासाठी जमीन, पैसे आणि राज्यसभा सदस्यत्वाची मागणी केली होती असा आरोप अमरनाथ मिश्रा यांनी केलाय. अमरनाथ मिश्रा हे अयोध्या समन्वय समितीचे अध्यक्ष आहेत. 5 फेब्रुवारीला नदवी यांची भेट घेतली होती, त्यावेळी त्यांनी अयोध्या राममंदिर विवादाबाबत एक लिखित प्रस्ताव देण्याची सूचना केली अशी माहिती मिश्रा यांनी दिली.

नदवी यांना अयोध्येमध्ये मक्केसारखी भव्य मशीद बांधायची होती. त्यासाठी त्यांनी 200 एकर जागा, एक हजार कोटी रुपये आणि राज्यसभा सदस्यत्त्वाची मागणी केली असा आरोप अमरनाथ मिश्रा यांनी केलाय. दरम्यान, नदवी यांनी मिश्रांचे आरोप फेटाळून लावलेत. हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा लोकांना अयोध्या विवाद संपवायचा नाही असा आरोपही नदवी यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2018 01:55 PM IST

ताज्या बातम्या