माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या संशयास्पद मृत्यूसंदर्भात मोठा गौप्यस्फोट

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त उर्फ एन.डी. तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी यांचा दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी खळबळजनक मृत्यू झाल्यानंतर आता एक खळबळजनक माहिती समोर येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 20, 2019 02:27 PM IST

माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या संशयास्पद मृत्यूसंदर्भात मोठा गौप्यस्फोट

दिल्ली, 20 एप्रिल : उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त उर्फ एन.डी. तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी यांचा दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी खळबळजनक मृत्यू झाला. त्यानंतर तपासाची चक्र फिरायला लागली आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये रोहित शेखर यांचा मृत्यू गळा दाबून झाला असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात त्यांच्या पत्नीची आणि सासऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे.

मोठ्या कायदेशीर संघर्षानंतर रोहित शेखर तिवारी यांनी एन.डी. तिवारी हे आपले पिता असल्याचं सिद्ध केलं होतं. त्यासाठी कोर्टाच्या आदेशानुसार माजी मुख्यमंत्र्यांची डीएनए टेस्टसुद्धा करण्यात आली होती. 2008 मध्ये रोहित शेखर यांनी कोर्टात केस दाखल केली होती आणि एन डी तिवारी हे रोहितचे खरे वडील असल्याचं कोर्टात 2012 मध्ये सिद्ध झालं होतं.

गेल्या मंगळवारी (16 एप्रिल)रोहित यांचा अनैसर्गिक मृत्यू झाला. यांची आई उज्ज्वला यांचं म्हणणं आहे की, रोहितचे पत्नी अपूर्वाबरोबर किरकोळ वादविवाद होत होते. यातून त्यांच्यात नेहमी भांडणं होत असत. त्यांच्या लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच दोघांमध्ये भांडणं होत होती, असं आई उज्जला यांनी सांगितल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं. दिल्ली क्राईम ब्रँच या प्रकरणी तपास करत आहे.


VIDEO: ...तर देशात निवडणुकीची गरजच काय?- उदयनराजे

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 20, 2019 02:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...