Home /News /national /

VIDEO: समुद्रकिनारी वाहून आला सोन्याप्रमाणे चमकणारा 'रहस्यमयी रथ'; भारतात नेमका कुठून आणि कसा पोहोचला?

VIDEO: समुद्रकिनारी वाहून आला सोन्याप्रमाणे चमकणारा 'रहस्यमयी रथ'; भारतात नेमका कुठून आणि कसा पोहोचला?

स्थानिक बोटीवाल्यांनी लावलेल्या अंदाजानुसार, चक्रीवादळाच्या जोरामुळे निर्माण झालेल्या भरतीच्या लाटांसोबत हा रथ किनाऱ्यावर पोहोचला असावा. यानंतर स्थानिक लोकांनी तो पाहिला आणि दोरीने बांधून किना-यावर आणला

    विशाखापट्टनम 11 मे : मंगळवारी संध्याकाळी आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली येथे समुद्रकिनाऱ्याजवळील लोकांना अचानक सोन्याचा रथ दिसला. सोन्यासारखा दिसणारा हा रथ समुद्रातून किनाऱ्याकडे सरकत होता (Mysterious Gold Coloured Chariot at Sunnapalli Sea). लोकांनी हा गूढ रथ पाहताच त्याला दोरीने बांधून किनाऱ्यावर ओढून आणलं. सुन्नापल्ली बीचवर उपस्थित स्थानिक लोकांनी रथाला दोरीच्या साहाय्याने बांधून किनाऱ्यावर आणलं. हा रथ अगदी सोन्याचा दिसत होता. मात्र, तो समुद्रात वाहून कुठून आला, हे सध्या कोणालाच कळू शकलेलं नाही. आग्नेय आशियाई देशांतील एखाद्या मठातून हा रथ वाहून आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रिपोर्टनुसार, चक्रीवादळामुळे हा रथ समुद्रात वाहून येत सुन्नापल्ली किनार्‍याजवळ पोहोचला असण्याची शक्यता आहे. मात्र, आतापर्यंत कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. Cyclone Asani: असनी चक्रीवादळाने मार्ग बदलला, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम, कुठे बरसणार पाऊस? स्थानिकांच्या मते, रथावर फॉरेन भाषेत काहीतरी लिहिलं आहे आणि ती मलेशियन, थायलंड किंवा जपानी भाषा असू शकते. हा रथ दुसऱ्या देशातून आला असावा असं श्रीकाकुलम पोलिसांचं म्हणणं आहे. याबाबत वरिष्ठांना कळवलं असल्याचं त्यांनी सांगितलं. स्थानिक बोटीवाल्यांनी लावलेल्या अंदाजानुसार, चक्रीवादळाच्या जोरामुळे निर्माण झालेल्या भरतीच्या लाटांसोबत हा रथ किनाऱ्यावर पोहोचला असावा. यानंतर स्थानिक लोकांनी तो पाहिला आणि दोरीने बांधून किना-यावर आणला. या सोन्याच्या रथाचं दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या संख्येनं किनाऱ्यावर पोहोचत असून हा रथ लोकांसाठी कुतूहलाचं विषय ठरत आहे. हा गूढ रथ सुनपल्लीतील नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत असून रथ पाहण्यासाठी शेकडो लोक पोहोचत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, संतबोममाळीचे तहसीलदार जे चलमैय्या यांनी असा अंदाज वर्तवला आहे की, 'हा रथ इतर कोणत्या देशातून आलेला नसेल. तो भारतातीलच एखाद्या किनाऱ्यावर चित्रपटाच्या शुटिंगसाठी वापरला गेला असेल आणि लाटांसोबत वाहून आला असेल.' कोलांटी उडी मारली आणि 20 वर्षीय तरुण पोहोचला lock-up मध्ये, IPS अधिकारी म्हणाला.. एशियानेट न्यूजच्या वृत्तानुसार, रथ मंदिराच्या आकाराचा असून अतिशय भव्य आणि सोन्यासारखा दिसत आहे. समुद्रातून रथ बाहेर आल्याचं वृत्त परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये धार्मिक भावनेची लाट उसळली असून गूढ रथाचं दर्शन घेण्यासाठी शेकडो नागरिक पोहोचत आहेत. त्याची वास्तुकला प्राचीन वास्तूंसारखी आहे. मात्र, या रहस्यमयी रथाबाबत अद्याप खात्रीपूर्वक काहीही सांगण्यात आलेलं नाही.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Gold, Sea, Video viral

    पुढील बातम्या