• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • ...म्हणून भाजपानं 6 वेळा माझं तिकीट कापलं! अमित शहांचा खुलासा

...म्हणून भाजपानं 6 वेळा माझं तिकीट कापलं! अमित शहांचा खुलासा

भाजपाचे मुख्य चाणक्य समजले जाणाऱ्या अमित शहांचं (Amit Shah) तिकीट तब्बल सहा वेळा पक्षानं कापलं होतं. स्वत: अमित शहा यांनीच हा खुलासा केला आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 11 एप्रिल : भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे सध्याच्या भारतीय राजकारणातील एक बडं नाव आहे. सलग दोन लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजय मिळवून देण्यात त्यांचा वाटा आहे. तसंच अनेक राज्यांच्या विधानभा निवडणुकीतही भाजपाच्या प्रचाराचं नेतृत्त्व त्यांच्याकडे असतं.  सध्या ते बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal assembly elections 2021) भाजपाचा जोरदार प्रचार करत आहेत. भाजपाचे मुख्य चाणक्य समजले जाणाऱ्या अमित शहांचं तिकीट तब्बल सहा वेळा पक्षानं कापलं होतं. स्वत: अमित शहा यांनीच हा खुलासा केला आहे. काय म्हणाले शहा? विधानसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आलेल्या कार्यकर्त्याची समजूत घालताना अमित शहा यांनी हा खुलासा केला आहे.  गुजरातमधील भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या गांधीनगर लोकसभा मतदार संघासाठी तब्बल 6 वेळा अमित शहांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (LK Advani) हे गांधीनगरचे खासदार होते. त्यामुळे अमित शहांना सहा वेळेस पक्षानं तिकीट नाकारले. अमित शहा अडवाणी यांचे निवडणूक अधिकारी म्हणून काम करत होते. अखेर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत न उभारण्याचा निर्णय अडवाणी यांनी घेतला. त्यानंतर भाजपाने अमित शहा यांना गांधीनगरमधून लोकसभेची उमेदवारी दिली. अमित शहा सध्या बंगालमध्ये भाजपाचा प्रचार करत आहेत. या प्रचारात त्यांनी  बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्यावर टीका केली आहे. ममता बॅनर्जी पराभवामुळे बिथरल्या आहेत. त्यांच्या राज्यात महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. पहिल्या तीन टप्प्यात भाजपा 63 ते 68 जागा जिंकणार असल्याचा दावा देखील शहा यांनी केला ( वाचा : कूचबिहारमध्ये जाण्यापासून ममतांना EC ने रोखलं, 4 ग्रामस्थांच्या मृत्यूनंतर खळबळ ) "भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये सतत हल्ले झाले. आमचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर देखील हल्ला झाला. या विरोधात टीएमसी नेत्यांनी काहीही वक्तव्य केलं नाही. त्यांचं मौन हे हिंसाचार करण्यास पाठिंबा देत आहे,'' असा दावा देखील अमित शहा यांनी केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published: