#PGStory : रात्रभर रडत असायची माझी रुममेट आणि एक दिवशी अचानक

#PGStory : रात्रभर रडत असायची माझी रुममेट आणि एक दिवशी अचानक

पीजीमध्ये राहत असताना एकमेकांसोबत सुख-दु:ख शेअर करण्याबरोबरच एकमेकांना उभारी, आत्मविश्वास दिला जातो आणि ते नातं अनोखं असतं

  • Share this:

मुंबई, 13 मे : शिक्षण अथवा कामासाठी घराबाहेर एखाद्या पीजीमध्ये राहण्याचा अनुभव खूप भारी असतो. प्रत्येकाने एकदा तरी हा अनुभव घ्यावा असं म्हणतात. तो तुम्हाला अनुभवसंपन्न तर बनवतोच शिवाय ह्रदयाशी जोडणारी नाती मिळवून देतो. सध्या देशभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यानिमित्ताने हॉस्टेल वा पीजीमधील (#PGStory) आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न.

ही कहाणी आहे कियारा सिद्दीकीची. फरहाना दिल्लीत राहून आयएएसची कोचींग करीत होती. यादरम्यान तिने प्रेम, करिअरच्या मागे धावाधाव यासह अनेक अडथळे पार केले होते. त्याच्याशीच संबंधित एक आठवण तिने आपल्यासोबत शेअर केली आहे.

मला शिकोहाबादहून दिल्लीला येऊन साधारण 2 वर्ष झाली होती. यादरम्यान पाच घरं तरी बदलली होते. यामागे अनेक कारणे होती. कधी रुममेटचा त्रास होता तर कधी घरमालक मनस्ताप द्यायचा. हा प्रसंग मी नोएडा सेक्टर 63 मध्ये राहत असतानाचा आहे. त्यावेळी मी रुचिता शर्मासोबत राहत होते. अत्यंत उत्साही होती ती. एका पीआर कंपनीत मॅनेजर होती. चांगला सॅलरी पॅकेज होता तिचा.

एकेदिवशी अचानक तिचं बॉससोबत भांडण झालं आणि रागाच्या भरात तिने नोकरी सोडून देण्याचा निर्णय घेतला. घरी परतल्यानंतर तिने आपल्या भावाला फोन केला आणि म्हटलं की मला ही नोकरी पुढे कायम करण्याची इच्छा नाही. तिच्या भावाने हा निर्णय तिच्यावरच सोडून दिला. रुचिताचं कुटुंब सधन होतं. त्यामुळे नोकरी नसली तिला आर्थिक त्रास सहन करावा लागणार नव्हता.

दुसऱ्या दिवशी तिने घरातूनच नोकरी सोडत असल्याचा मेल केला. नोकरी सोडल्यानंतर दोन प्रकारच्या भावना एकत्र अनुभवाव्या लागतात. एकतर खूप हलकं हलकं वाटतं आणि दुसरं म्हणजे भविष्याचं टेंशन असतं. त्या रुममध्ये मी आणि रुचिता आम्ही दोघीचं राहत होतो. मी रात्री घरी आल्यानंतरही रुचिता आनंदी असायची. नोकरी शोधायचा तिचा प्रयत्न सुरू होता. अनेकदा रात्री ती माझ्यासाठी चांगलचुंगल खायला तयार करायची. अनेकदा मला आश्चर्य वाटायचं की नोकरी सोडल्यानंतरही ही इतकी आनंदी कशी...दोन महिने असेच उलटून गेले. एकेदिवशी रात्री मी रुचिताच्या रुमसमोरुन गेले..तेव्हा खोलीत ती मला दिसली नाही. इतक्या रात्री कुठे गेली असेल या चिंतेत मी तिला शोधू लागली.

घरभर शोधलं तर ती गॅलरीमध्ये ढसाढसा रडत बसली होती. इतकी आनंदी असल्याचं दाखविणारी रुचिता आज अगदी गळून गेली होती. तिचा आत्मविश्वास एकदमचं कमी झाला होता. मला नोकरी मिळणार नाही...माझ्यात गुणवत्ता नाही या विचाराने ती नैराश्यात गेली होती. त्यानंतर पुढील काही दिवस ती शांतच होती.. घरात कायम हसणारी-खिदळणारी रुचिता आता एकदम शांत झाली होती. या एक घटनेनं तिचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये यासाठी काहीतरी करणं आवश्यक होतं. त्यानंतर एके दिवशी मी तिला मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन गेले. त्यानंतर पुढील काही दिवस तिची खूप काळजी घेतली. अगदी तिचं खाणं-पिणं...तिच्याशी खूप गप्पा मारायचे.

अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला एकटं वाटू नये हा प्रयत्न करायला हवा असं मी कुठंतरी वाचलं होतं. मी पुढील दोन ते तीन महिने तिची खूप काळजी घेतली. त्यानंतर सुदैवाने तिला अधिक चांगली पगाराची आणि पदाची नोकरी मिळाली आणि मला खूप आनंद झाला. ही गोष्ट कदाचित खूप लहान वाटेल...मात्र एक जीव वाचवल्याचा व त्याला पुन्हा उभारी दिल्याचा आनंद हा कोणत्याही गोष्टीहून खूप मोठा असतो. आज रुचिता एका मोठ्या कंपनीत चांगल्या पदावर आहे. गेल्या अनेक वर्षात आमची भेट झाली नाही मात्र आठवण कायम येते.

संबंधित-लॉकडाऊनमध्ये अनोखा विवाहसोहळा; कोरोना योद्ध्यांच्या साक्षीने बांधली लग्नगाठ

First published: May 13, 2020, 9:57 PM IST

ताज्या बातम्या