आई-बाबा कधी शाळेतचं गेले नाही; पण मुलाने दहावीच्या परीक्षेत केलं टॉप

आई-बाबा कधी शाळेतचं गेले नाही; पण मुलाने दहावीच्या परीक्षेत केलं टॉप

त्याचे वडील म्हणाले की, मी व माझी पत्नी आम्ही कधीच शाळेत गेलो नाही. परंतु शिक्षणाचे महत्त्व आम्हाला समजते.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जून : सर्वांच्याच आयुष्यात दहावीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो. हा टप्पा तुमचं करिअर ठरवत असतो. त्यामुळे मुलं मन लावून दहावीचा अभ्यास करतात. उत्तर प्रदेश माध्यमिक परीक्षा मंडळ, यूपी बोर्डाने हायस्कूल व इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल जाहीर केला असून यासह दहावी आणि बारावीच्या प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर झाली आहेत.

दहावीच्या टॉपर्सच्या यादीत अभिमन्यू वर्माचे नाव दुसर्‍या स्थानावर आहे. अभिमन्यूने 95.83 टक्के गुण मिळविले आहेत. तो बाराबंकी येथील श्री साई इंटर कॉलेजचा विद्यार्थी असून बाराबंकी येथे राहतो.

त्याचे वडील रामहेत वर्मा हे एक लहान शेतकरी आणि आई शकुंतला घर सांभाळते. यंदा रिया जैनने यूपीच्या दहावीच्या वर्गात 96.67 % गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला आहे.

हे वाचा-ना हात, ना पाय; फक्त डोकं आणि धडासह जन्माला आली मुलगी; मग कुटुंबाने...

न्यूज 18 हिंदीने अभिमन्यूला यावर्षी दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांना संदेश देण्यास सांगितले असता तो म्हणाला की, पालक आणि शिक्षक यांच्या मार्गदर्शनाकडे लक्ष द्यावे आणि त्यांचं ऐकलं पाहिजे. अभिमन्यूने न्यूज 18 ला सांगितले की त्याचे वडील एक शेतकरी आहेत आणि पेरणीपासून कापणीपर्यंत त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आव्हानांचा सामना करताना कशी तयारी करावी हे त्यांनी आपल्या वडिलांकडून शिकले.

पालक कधीही शाळेत गेले नाहीत

अभिमन्यूचे वडील आणि आई कधीच शाळेत गेले नाहीत. पण त्यांनी आपल्या मुलाच्या अभ्यास कमतरता होऊ दिली नाही. अभिमन्यूला दोन बहिणीही आहेत. त्याचे वडील म्हणाले की, मी व माझी पत्नी आम्ही कधीच शाळेत गेलो नाही. परंतु शिक्षणाचे महत्त्व आम्हाला समजते. ते म्हणाले की आमचा मुलगा खूप हुशार आहे आणि त्याला शिक्षणाचे महत्त्व देखील समजले आहे.

First published: June 28, 2020, 10:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading