माझी आई दुसऱ्यांपेक्षा जास्त भारतीय - राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना उत्तर

माझी आई दुसऱ्यांपेक्षा जास्त भारतीय - राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना उत्तर

इतर कुणाही पेक्षा सोनिया गांधी या जास्त भारतीय आहेत हे लक्षात घ्या, असा टोला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.

  • Share this:

बंगळूरू,ता.10 मे: विकासाच्या गोष्टी करणाऱ्या भाजपने कर्नाटकात फक्त आरोप-प्रत्यारोपाचं खालचं राजकारण केलं. सोनिया गांधींचं मूळ इटलीचं असल्याचा पुन्हा एकदा उल्लेख केला. इतर कुणाही पेक्षा सोनिया गांधी या जास्त भारतीय आहेत हे लक्षात घ्या, असा टोला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.

राहुल गांधींनी आधी हातात कागद न घेता 15 मिनिटं कुठल्याही भाषेत भाषण करून दाखवावं. ते जमत नसेल तर आपल्या आईच्या मातृभाषेत बोलावं असं प्रत्युत्तर मोदींनी त्यांना दिलं होतं.

त्यावर आज राहुल गांधींनी पंतप्रधानांना धारेवर धरलं. कर्नाटक विधासभा निवडणूकीचा प्रचार आज संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी घेतलेल्या पत्रकार परिषद ते बोलत होते.

राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतले महत्वाचे मुद्दे

  • पंतप्रधान आणि त्यांच्या व्यापारी मित्रांना फायदा पोहोचवण्यासाठीच राफेल विमानांचा सौदा करण्यात आला. ज्यांना विमान बनविण्याचा अनुभव नाही त्यांना हे कंत्राट देण्यात आलं.
  • दलित आणि अल्पसंख्याकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.
  • काँग्रेसचा चढता आलेख पाहून भाजप घाबरला आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रत्येक घटनात्मक संस्थेचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करतंय.
  • माझ्या पंतप्रधानपदाच्या वक्तव्याचा विपर्यास करून मुद्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय. पण भाजपला कसं डील करायचं याची मला आता माहिती आहे. मी त्यांना तसं करू देणार नाही.

First published: May 10, 2018, 2:53 PM IST

ताज्या बातम्या