Home /News /national /

प्रेमाचा खून! पत्नीचा भाडेकरूवर जडला जीव, रात्री पतीचा डोळा लागताच केले तब्बल 25 वार

प्रेमाचा खून! पत्नीचा भाडेकरूवर जडला जीव, रात्री पतीचा डोळा लागताच केले तब्बल 25 वार

अवैध संबंधांच्या वेड्यात तिने प्रियकरासह आपल्या पतीची धारधार चाकूने निर्घृण हत्या केली.

    मुजफ्फरपूर, 17 एप्रिल : एकीकडे देशात कोरोना थैमान घालत असताना दुसरीकडे गुन्हेगारीची प्रकरणेही वाढत आहेत. मुझफ्फरपुरात कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. मुझफ्फरपुरमध्ये एका पत्नीने आपल्या पतीचा खून केला. असा आरोप केला जात आहे की अवैध संबंधांच्या वेड्यात तिने प्रियकरासह आपल्या पतीची धारधार चाकूने निर्घृण हत्या केली. मयत राजेश सिंग याच्यावर 20 ते 25 वार करण्यात आले. पोलिसांनी आरोपी पत्नी रीना देवीला ताब्यात घेतले असून तिचा मारेकरी प्रियकर मनीष या घटनेनंतर फरार झाला आहे. आरोप असा आहे की पत्नी रीना याआधी आपल्या पतीला तुरूंगात पाठवले होते, कारण राजेशने पत्नीच्या अवैध संबंधांना विरोध दर्शविला होता. ही बाब अजूनही कोर्टात सुरू आहे, पण यावेळी पत्नीने पती राजेशचा खून करत पतीने काटा काढला. ही घटना अहियापूर पोलिस स्थानकाच्या जवळ सकाळी घडली. वाचा-आत्महत्या करण्यासाठी फ्लायओव्हरवरून तरुणाची उडी, पोलीस पोहोचले आणि... भाडेकरूवर खुनाचा आरोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिकवणी घेत असलेल्या राजेश सिंह आपली पत्नी आणि दोन मुलांसमवेत अहियापूर येथील नाझीरपूर येथे राहत होता. राजेश यांचे तीन मजली घर असून त्यात अनेक भाडेकरू राहतात. असे सांगितले जात आहे की सुमारे दोन वर्षांपासून त्याची पत्नी रीना यांचे एका भाडेकरू मनीषशी अवैध संबंध होते. या प्रकरणावरून पती-पत्नीमध्ये बरेच वाद झाले. बर्‍याचदा तेथे भांडणही होत असे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश मनीषला घर सोडण्यास सांगत होता. राजेश आणि मनीष यांच्यात अनेकदा वाद झाले, पण प्रत्येक वेळी रीनाने त्याचा बचाव केला. मनीषच्या प्रेमात वेडी झालेल्या रीनाने आपल्या पतीवर खोटे आरोप करून राजेशला तुरूंगात पाठविले होते. वाचा-पुणेकर खबरदार जर बायकोशी भांडाल, व्हावं लागेल क्वारंटाईन! असा केला खूनाचा प्लॅन खूनाच्या आदल्या दिवशी रात्री, पती आणि पत्नी झोपले असताना रात्री तीन वाजेच्या सुमारास मनीष चाकू घेऊन घरात शिरला. खोलीत पोहोचताच मनीषने पलंगावर झोपलेल्या राजेशवर सुराने वार केले. त्यावेळी रीनासुद्धा तिकडेच होती.राजेशला ठार केल्यानंतर मनीषने तेथून पळ काढला, त्यानंतर रीनाने रडालया सुरुवात केली. रीनाने पोलिसांना इतक्या मोठ्या घटनेची माहितीही दिली नाही. इतर भाडेकरूंनी पोलिसांना दिली माहिती राजेशच्या घरात राहणाऱ्या इतर भाडेकरूंनी अहियापूर पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. पोलीस आल्यावर रीना संपूर्णपणे रक्ताने माखली होती. तर, राजेशचा रक्ताचा मृतदेह पलंगाखाली पडून होता. अहियापूर पोलिसांच्या माहितीनुसार नगरचे डीएसपी रामनरेश पासवान आणि सीटी एसपी नीरज कुमार सिंह यांनीही घटनास्थळी पोहोचून प्रथम पत्नी रीनाला ताब्यात घेतले. रीनाच्या मुलीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. असेही सांगितले जात आहे की, मनीषने राजेशची हत्या केली होती आणि त्यावेळी रीना जागी होती. वाचा-या देशात लोकांनी लॉकडाऊनची लावली वाट, पोलिसांनी 18 जणांना गोळ्या घालून केलं ठार पोलिसांनी दिली माहिती अहियापूर पोलिस स्टेशनचे विकास अधिकारी विकास कुमार म्हणाले की, पतीच्या हत्येनंतर रीनाने पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही, यामुळे बरेच प्रश्न निर्माण होतात. खोलीत मृतासोबत केवळ त्याची पत्नी होती. तिनेच मनिषला घरात येण्यासाठी दरवाजा उघडल्याची शक्यता आहे. तर, एसपी नीरज सिंह म्हणतात की, या घटनेची अनेक बाजू आहेत. सध्या आरोपी रीनाची चौकशी केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहितीही मुलांकडून घेण्यात येत आहे. पोलिसांनी त्यांना त्यांच्या संरक्षणाखाली ठेवले आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी एसकेएमसीएच येथे पाठविला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Crime

    पुढील बातम्या