अंत्यसंस्कारानंतर सुरू होती श्राद्धाची तयारी, अचानक घरी पोहोचला मृत तरुण!

अंत्यसंस्कारानंतर सुरू होती श्राद्धाची तयारी, अचानक घरी पोहोचला मृत तरुण!

सेवानिवृत्त सैनिक रामसेवक ठाकूर यांचा मुलगा संजीव कुमार 25 ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाला. बरीच शोधाशोध केल्यानंतरही कोणालाच तो सापडला नाही.

  • Share this:

मुजफ्फरपूर(बिहार)12 सप्टेंबर : गमावलेले प्राण कधीही परत येत नाहीत. विज्ञानातही मृत व्यक्ती जीवंत करण्यासाठी अद्याप कोणतंही तंत्रज्ञान नाही आहे. पण मृत व्यक्ती जीवंत होऊन घरी आल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर कुटुंबीय घरी येण्याआधीच मृत तरुण घरी आला होता. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. ज्याचे अंत्यसंस्कार केले त्यालाच घरी पाहिल्यानंतर सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकला. पण सगळा प्रकार उघड झाल्यानंतर कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना. या युवकाला पाहण्यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी सध्या गर्दी केली आहे.

ही घटना मुशहरी पोलिस स्टेशन परिसरातील बुधनगर गावची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधनगरा इथल्या सेवानिवृत्त सैनिक रामसेवक ठाकूर यांचा मुलगा संजीव कुमार 25 ऑगस्ट रोजी अचानक बेपत्ता झाला. बरीच शोधाशोध केल्यानंतरही कोणालाच तो सापडला नाही. अशा परिस्थितीत 30 ऑगस्ट रोजी कुटूंबाने त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार मुशहरी पोलीस ठाण्यात नोंदवली. दरम्यान, मीनापुरात एक पाण्यात पडलेला मृतदेह आढळला. तो मृतदेह बेपत्ता तरुणाचा असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवून घेतली आणि आपलाच मुलगा असल्याचं म्हटलं. नंतर त्यांनी तरुणावर अंत्यसंस्कार केले.

इतर बातम्या - स्पा सेंटरमध्ये महिला आयोगाची धाड, एका खोलीत 3 ग्राहक 4 मुली आणि आढळले कंडोम!

संजीवला जीवंत पाहून कुटुंबाला झाला आनंद

संजीव असं बेपत्ता झालेल्या युवकाचं नाव आहे. बुधवारी संजीव अचानक गावात पोहोचला. संजीवला पाहिल्यावर पालक आणि कुटुंबीय खूप खूश झाले आणि त्यांनी इतर नातेवाईकांना याची माहिती दिली. खरंतर संजीव 25 ऑगस्ट रोजी न सांगता घराबाहेर पडला. संजीवच्या वडिलांनी सांगितलं की, रुग्णालयात मृतदेह संजीव सारखाच होता, त्यामुळे त्यांची ओळख चुकली. मुशहरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची पोलिसांत नोंद करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे.

दरम्यान, संजीवच्या नातेवाईकांनी जाळला तो मृतदेह नेमका कोणाचा होता, याचाही तपास सुरू आहे.

इतर बातम्या - उदयनराजेंचं भाजप प्रवेशावर काय ठरलं?, तातडीने घेणार शरद पवारांची भेट

VIDEO: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंडे बंधु-भगिनीत जुंपली; केला 'हा' गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bihar News
First Published: Sep 12, 2019 12:30 PM IST

ताज्या बातम्या