Home /News /national /

'अमेरिकन ब्यूटी'...'शुगर फ्री' आंब्याची शेतकऱ्याकडून लागवड; पिकेपर्यंत 16 वेळा बदलतो रंग

'अमेरिकन ब्यूटी'...'शुगर फ्री' आंब्याची शेतकऱ्याकडून लागवड; पिकेपर्यंत 16 वेळा बदलतो रंग

हा आंबा शुगर फ्री असल्याचा दावा केला जात आहे मात्र, डायबेटिस असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तो खरेदी करण्याचा विचार करावा.

मुजफ्फरपूर, 30 जून : फळांचा राजा आंबा (Mango) कोणाला आवडत नाही. फेब्रुवारी, मार्च आला की बाजारात आंबे येण्यास सुरुवात होते आणि अगदी पावसाळा सुरू होईपर्यंत आंब्याची चव चाखायला मिळत असते. तसं आपल्याला हापूस, केशर, पायरी, तोतापुरी, गावठी एवढ्या जाती माहित असल्यातरी आंब्याच्या विविध आणि आगळ्यावेगळ्या जाती आहेत, आणि त्यांची चवही वेगळी असते. बिहारमध्ये पिकणाऱ्या रंग बदलणाऱ्या शुगर फ्री (Sugar Free) आंब्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मुशाहरी ब्लॉक येथील शेतकरी राम किशोर सिंह यांच्या बागेत हा शुगर फ्री आंबा पिकतो. तो आंब्यासारखा दिसत नसला तरी ती आंब्याचीच एक प्रजाती आहे, ज्याला ‘अमेरिकन ब्युटी’ असं म्हणतात. मुझफ्फरपूर हे शहर खरं तर देश आणि जगभरात लिची या फळाच्या उत्पादनासाठी खूप प्रसिद्ध आहे. पण, अलीकडे शुगर फ्री आंब्यामुळे ते खूप चर्चेत आलं आहे. साखरेचा (Sugar) त्रास असणाऱ्यांना म्हणजे डायबेटिसच्या रुग्णांना इच्छा असूनही आंबा खाण्यापासून वंचित राहावं लागतं. मात्र, आता बिहारमधील या शेतकऱ्याने केलेल्या यशस्वी प्रयोगामुळे आशा रुग्णांनाही आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे. स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा धोका जास्त का? अशाप्रकारे घ्या काळजी शेतकरी राम किशोर सिंह यांच्या बागेत शुगर फ्री आंबा पिकतो. त्यांच्या मळ्यात उगवणारी अमेरिकन ब्युटी ही आंब्याची ही प्रजाती शुगर फ्री आहे. त्याचा आकार नेहमीच्या आंब्यापेक्षा वेगळा आणि थोडा मोठा असा आहे. एका आंब्याचं वजन हे सुमारे अर्धा किलो आहे आणि हा आंबा पिकण्यासाठी 5 महिने लागतात. याचा अर्थ, अमेरिकन ब्युटी आंबा जून-जुलैमध्ये पिकण्यास सुरूवात होते, म्हणजे आंब्याचा सीझन संपतो, तेंव्हा हा आंबा पिकण्यास सुरूवात होते. या आंब्यामध्ये नेहमीच्या आंब्यासारखेच गुणधर्म आहेत. पण, हा गोडीला मात्र कमी आहे. कृषी विद्यापीठ समस्तीपूर आणि नॅशनल रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ लिचीच्या शास्त्रज्ञांनीही त्याची चव चाखली असून, त्याची चव सामान्य आंब्यांपेक्षा कमी गोड आणि साखरमुक्त असल्याचं आढळून आलं आहे. Anemia Treatment : बीट खाण्याचा कंटाळा मग रक्तवाढीसाठी हे फूड कॉम्बिनेशनही ठरेल फायद्याचं  16 वेळा रंग बदलतो तुम्ही रंग बदलणारा सरडा पाहिलाय का? शॅमेलिऑन असं त्याचं नाव. हा सरडा जिथं जाईल त्या ठिकाणच्या रंगाचा दिसतो. म्हणजे हिरव्या झाडांत हिरवा, मातीवर मातकट रंगाचा दिसतो. निसर्गाने स्वसंरक्षणासाठी त्याला हे वरदान दिलंय. हा सरडा जसा रंग बदलतो तसा हा आंबाही पिकेपर्यंत अनेकर रंग बदलतो. आंबा झाडावरच असतो; पण तो हिरवा-पिवळा-लालसर होण्यापूर्वी हा आंबा 16 वेळा रंग बदलतो. पूर्ण पिकल्यावर त्याचा रंग लाल होतो. बाजारात त्याची किंमतही जास्त असून, एका किलोला चार हजार रुपये दर आहे. म्हणजे विचार केला तर 2 हजार रुपयांना एक आंबा पडतो. हा आंबा शुगर फ्री असल्याचा दावा केला जात आहे मात्र, डायबेटिस असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तो खरेदी करण्याचा विचार करावा.
First published:

Tags: Fruit

पुढील बातम्या