बिहारमध्ये 'बर्निंग बस',२७ जणांचा होरपळून मृत्यू

बिहारमध्ये 'बर्निंग बस',२७ जणांचा होरपळून मृत्यू

ही बस मुझफ्फरनगर येथून दिल्लीला जात असताना राष्ट्रीय महामार्ग 28वर हा अपघात झालाय

  • Share this:

बिहार, 03 मे : बिहारमधील मोतिहारी येथे बस पलटी होऊन आग लागली. या अपघातात 27 प्रवाशांचा मृत्यू झालाय.

ही बस मुझफ्फरनगर येथून दिल्लीला जात असताना राष्ट्रीय महामार्ग 28वर हा अपघात झालाय. बसचालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्यावरुन खाली उतरली आणि थेट खड्डयात जाऊन पलटी झाली. यानंतर बसला आग लागली ज्यामुळे प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्यास वेळ मिळाला नाही आणि होरपळून त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर ग्रामस्थांसहित अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी प्रवाशांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. या बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.

First published: May 3, 2018, 11:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading