दिरानं केला बलात्कार, नवऱ्याला कळताच पत्नीला पाठवली घटस्फोट नोटीस

दिरानं केला बलात्कार, नवऱ्याला कळताच पत्नीला पाठवली घटस्फोट नोटीस

मुज़फ्फरनगरतील टंढेड़ा या गावात नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय. एका विवाहितेवर तिच्या सख्ख्या दिरानच बलात्कार केलाय.

  • Share this:

मुज़फ्फरनगर, 30 ऑक्टोबर : मुज़फ्फरनगरतील टंढेड़ा या गावात नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय. एका विवाहितेवर तिच्या सख्ख्या दिरानच बलात्कार केलाय. हा धक्कादायक प्रकार जेव्हा पीडितेने तीच्या दिल्लीला असलेल्या नवऱ्याला सांगितलं त्यानंतरच्या घटनेवर तुमचा विश्वासच बसणार नाही. घटनेची माहिती मिळताच आपल्या भावावर गुन्हा नोंदवायचा सोडून या निर्दयी पतीने थेट पत्नीलाच घटस्फोटाची नोटीस पाठवली.अखेर पीडितेनं ककरौली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.

टंढेड़ा गावातील रहिवासी फखरुद्दीन याच्याशी 16 मार्च 2017 रोजी पीडितेचा विवाह झाला होता. फखरुद्दीन हा दिल्लीतल्या एका मशिदीत इमाम म्हणून काम करत असल्यामुळे त्याचं घरी येणंजाणं कमी होतं. मात्र, लग्न झाल्यापासून फखरुद्दीनचा भाऊ मुईनुद्दीन याची एकट्या राहणाऱ्या वहिनीवर तिरपी नजर होती. अधुनं-मधुनं तो तीला त्रासही द्यायचा. पण, गेल्या शनिवारी मुईनुद्दीनं खोलीत शिरला आणि तिला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. पीडितेनं सर्वप्रथम ही बाब दिल्लीला राहत असलेल्या तिच्या नवऱ्याला सांगितली. पण, काहिही न एकता फखरुद्दीननं तीला पोस्टाद्वारे डिव्होर्स नोटीस पाठवली.

यासंदर्भात पीडितेनं रविवारी तिचा भाऊ अमजद याच्या मदतीनं ककरौली ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत तीने तिच्यावर बेतलेला प्रसंगाची हकिकत सांगितली असून, मुईनुद्दीन आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचंही तिने तक्रारीत म्हटलंय. याप्रकरणी पोलीस अधीस तपास करत आहे.

 VIDEO: नगरसेविकेचा स्टंट, आंदोलनासाठी चढली थेट हाय मास्ट दिव्याच्या खांबावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2018 10:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading