S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

उत्तरप्रदेशातील रेल्वे अपघातात मृतांची संख्या 23 वर

उत्कल एक्स्प्रेस ही पुरीहुन हरिद्वारकडे जात होती. मुजफ्फरनगरच्या खतौलीजवळ जेव्हा रेल्वे पोहचली तेव्हा अपघात झाला.

Sachin Salve | Updated On: Aug 19, 2017 09:44 PM IST

उत्तरप्रदेशातील रेल्वे अपघातात मृतांची संख्या 23 वर

18 आॅगस्ट : उत्तरप्रदेशमध्ये मुजफ्फरनगरच्या खतौलीत कलिंग उत्कल एक्स्प्रेसचे पाच डबे रुळावरून घसरले आहे. या दुर्घटनेत  23 जणांचा मृत्यू झालाय तर 40 जण जखमी झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रेल्वे अपघातासाठी हेल्पलाईन नंबर 9760534045/   9760535101  जाहीर करण्यात आलाय.

उत्कल एक्स्प्रेस ही पुरीहुन हरिद्वारकडे जात होती. मुजफ्फरनगरच्या खतौलीजवळ जेव्हा रेल्वे पोहचली तेव्हा अपघात झाला. या अपघातात 40 जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. या अपघातानंतर रेल्वेचे अपघातग्रस्त डबे एकमेकांवर आदळले. एक डबा हा रेल्वे रुळालगतच असलेल्या काॅलेजमध्ये घुसलाय.

पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतलीये. युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. मात्र, अंधार असल्यामुळे मदतकार्यात अडथळा येत आहे. केंद्रीय मंत्री संजीव बालियान घटनास्थळावर पोहचले आहे. गॅस कटरच्या सहाय्याने डबे कापून प्रवाशांना बाहेर काढलं जात असल्याची माहिती त्यांनी दिलीये.मेरठ आणि मुजफ्फरनगर येथून अॅम्बुलन्स घटनास्थळी पोहोचल्या आहेत. उत्तर प्रदेश एटीएसची टीमसुद्धा घटनास्थळी दाखल झाली आहे. तसंच एनडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून सर्व जखमी प्रवाशांवर योग्य उपचार करण्याचे आदेश दिले आहे.

रेल्वे सीपीआरओ अनिल सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 5.50च्या सुमारास 18477 पुरी-गरिद्वार खतौलीजवळ रेल्वेचे 6 डबे घसरले आहे. जखमींबद्दल पूर्ण माहिती मिळू शकली नाही.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू स्वत: या अपघातावर लक्ष ठेवून आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहचण्याचे आदेश दिले आहे. तसंच तातडीने मदत आणि बचावकार्याचे आदेश दिले आहे.

या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यताही फेटळण्यास नकार देण्यात आलाय. कारण रेल्वे रूळ आधीच तुटलेला होता. त्यामुळे घातपाताचा संशय बळावलाय. मागील वर्षीही कानपूर रेल्वे अपघात अशाच प्रकारे झाला होता. यामागे पाकिस्तानातील आयएसआयचा हात असल्याचं समोर आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2017 07:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close