मराठी बातम्या /बातम्या /देश /'मंगळवारी मटणाची दुकानं बंद राहणार'; भाजप सरकारच्या निर्णयावर भडकले ओवैसी

'मंगळवारी मटणाची दुकानं बंद राहणार'; भाजप सरकारच्या निर्णयावर भडकले ओवैसी

ओवैसी यांनी या निर्णयावर निषेध व्यक्त केला आहे

ओवैसी यांनी या निर्णयावर निषेध व्यक्त केला आहे

ओवैसी यांनी या निर्णयावर निषेध व्यक्त केला आहे

हरियाणा, 19 मार्च : हरियाणातील गुरुग्रामच्या महानगर पालिकेच्या सामान्य बैठकीत मंगळवारी मटणाची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वॉर्ड क्रमांक 23 चे नगरसेवक अश्वनी शर्मा यांनी मटण आणि चिकनची दुकानं बंद ठेवण्याची सूचना दली होती. या निर्णयाविरोधात देशभरात टीका केली जात आहे. यानंतर MIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी ट्वीट करीत या निर्णयाचा निषेध केला आहे. (Mutton shops will be closed on Tuesday Owaisi angry over BJP governments decision)

ओवैसी याबद्दल म्हणाले की, इतर लोक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात, यावरुन एखाद्याच्या भावना कशा दुखावू शकतात? लोक आपल्या इच्छेने मटण वा चिकन खरेदी करतात, विकतात व आणि खातात. यासाठी त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती केली जात नाही. असं असेल तर शुक्रवारी दारुची दुकानं का बंद केली जात नाहीत? मटण हे भारतातील लाखो लोकांचं अन्न आहे. त्यामुळे याकडे काहीतरी अशुद्ध आहे, असा दृष्टिकोन योग्य नाही. गुरुग्राममध्ये मंगळवारी मटणाची दुकानं बंद ठेवण्याच्या निर्णयासंबंधित बातमीचं कात्रण रिट्वीट करीत ओवैसी यांनी आपलं मत व्यक्त केलं.

हे ही वाचा-OMG यांचे गुडघे दिसतायंत..', प्रियांका गांधींनी का पोस्ट केला मोदींचा हा PHOTO?

त्याशिवाय पालिकेच्या बैठकीनुसार अनधिकृत मटण विक्रेत्यांवर लावली जाणारं चलानची किंमत 500 रुपयांनी वाढवून 5000 रुपयांपर्यंत करण्याचा निर्णय झाला आहे. याशिवाय 3 वेळा चलान कापल्यानंतर संबंधित मटणाचं दुकान सील केलं जाईल. जर सील केलेलं दुकान कोणी उघडलं तर त्याच्याविरोधात केस दाखल करण्यात येईल. या बैठकीतच मंगळवारी मटणाची दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

First published:

Tags: Asaduddin owaisi, MIM