श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद अखेर कोर्टात, मुथरा जिल्हा न्यायालयाने दाखल करून घेतली याचिका

श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद अखेर कोर्टात, मुथरा जिल्हा न्यायालयाने दाखल करून घेतली याचिका

याचिकेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीच्या 13.37 एकर जागेची मालकी मागण्यात आली आहे. या प्रकरणी कोर्टाने सुन्नी वक्फ बोर्ड आणि ईदगाह मशिद ट्रस्ट यांनाही नोटीस बजावली आहे.

  • Share this:

मथुरा 16 ऑक्टोबर: रामजन्मभूमीचा (Ram Janmbhumi) वाद मिटल्यानंतर आता मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमीचा (Krishna Janmbhumi) वाद अखेर कोर्टात गेला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागेच्या मालकी हक्काचा हा वाद आहे. या आधी सिव्हिल कोर्टाने याचिका फेटाळून लावली होती. त्याला मथुरा जिल्हा न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर कोर्टाने जागेच्या मालकीबाबतची याचिका शुक्रवारी दाखल करून घेतली असं वृत्त ‘आज तक’ ने दिलं आहे. या प्रकरणी कोर्टाने सुन्नी वक्फ बोर्ड आणि ईदगाह मशिद ट्रस्ट यांनाही नोटीस बजावली आहे.

याचिकेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीच्या 13.37 एकर जागेची मालकी मागण्यात आली असून शाही ईदगाह मशीद हटविण्याची मागणी केली आहे.

श्रीकृष्ण विराजमान सहीत 8 जणांनी याचिका दाखल केली आहे. या आधी भगवान कृष्ण विराजमान, कटरा केशव देव खेवाट, मथुरा बाजार शहर येथील जागेसाठी याचिकाकर्त्या रंजना अग्निहोत्री आणि इतर सहा भाविकांनी ही याचिका दाखल केली होती.

श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागेवर मुघलकाळात कब्जा करण्यात आला होता. नंतर या जागेवर शाही ईदगाह मशीद बांधण्यात आली होती. आता याच जागेवरील शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. मात्र कोर्टाने ती याचिका फेटाळली होती.

काय आहे प्रकरण?

या आधीच्या याचिकेत माहिती देण्यात आली होती की, औरंगजेबानं 1669-70 मध्ये श्रीकृष्णाच्या जन्माचं श्रीकृष्ण मंदिर कटरा केशवदेव येथे पाडले आणि एक इमारत बांधली गेली. नंतर या इमारतीस ईदगाह मशीद असं संबोधलं गेलं. 100 वर्षांनंतर मराठ्यांनी गोवर्धनची लढाई जिंकली आणि आग्रा व मथुराच्या संपूर्ण प्रांताचे राज्यकर्ते बनले. नंतर मराठ्यांनी मशिदीची तथाकथित रचना पाडून टाकल्यानंतर कटरा केशवदेव येथे भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान विकसित केलं. त्याचं नूतनीकरण केले.

देवमाशाची कृपा! Whale ने केली उलटी आणि तो झाला करोडपती

1803 मध्ये इंग्रजांनी मथुरा ताब्यात घेतल्यानंतर त्या जागेवर कोणताही बदल करण्यात आला नाही. ब्रिटिशांनी 1815 मध्ये 13.37 एकर जागेचा लिलाव करत बनारसचा राजा पाटणी मल यांना ती जमीन विकली. ते या जमिनीचे मालक झाले, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे.

रंजना अग्निहोत्री यांच्यामार्फत दाखल केलेला याचिकेत उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाचे सदस्य, ट्रस्ट मशीद ईदगाह किंवा मुस्लिम समाजातील कोणत्याही सदस्याला कटरा केशव देव यांच्या मालमत्तेत रस किंवा अधिकार नाही, असा दावा करण्यात आला होता.

मानलं या उपराज्यपालांना! रुग्णांच्या सेवेसाठी दिलं ‘राजभवना’चं हेलिकॉप्टर

1921 मध्ये काही मुस्लिमांनी जमिनीवर मालकी हक्क सांगणारी याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळून लावली. फेब्रुवारी 1944 मध्ये राजा पाटणी मल यांच्या वारसदारांनी ही जमीन पंडित मदनमोहन मालवीय, गोस्वामी गणेश दत्त आणि भिकण लालजी अत्रे यांना 19 हजार 400 रुपयांना विकली. मात्र, ऑक्टोबर 1968 मध्ये श्री कृष्णा जन्मभूमी सेवा संघ आणि शाही मशीद ईदगाह सोसायटी यांच्यात या जागेचा मालकी नसतानाही करार झाला.

जुलै 1973 मध्ये मथुरा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी या कराराच्या आधारे प्रलंबित खटल्याचा निर्णय घेतला होता. सध्या असलेल्या संरचनांमध्ये बदल करण्यास मनाई केली.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 16, 2020, 11:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading