मराठी बातम्या /बातम्या /देश /

प्रत्यक्ष घडला ‘बजरंगी भाईजान’, मूकबधिर तरुणाला अखेर सापडली त्याची आई

प्रत्यक्ष घडला ‘बजरंगी भाईजान’, मूकबधिर तरुणाला अखेर सापडली त्याची आई

 रेल्वे स्टेशनवर (Railway station) स्थानिकांना सापडलेला एक अज्ञात आणि मूकबधिर तरूण (mute and deaf man) नेमका कुठला आहे, याचा अखेर शोध लागला.

रेल्वे स्टेशनवर (Railway station) स्थानिकांना सापडलेला एक अज्ञात आणि मूकबधिर तरूण (mute and deaf man) नेमका कुठला आहे, याचा अखेर शोध लागला.

रेल्वे स्टेशनवर (Railway station) स्थानिकांना सापडलेला एक अज्ञात आणि मूकबधिर तरूण (mute and deaf man) नेमका कुठला आहे, याचा अखेर शोध लागला.

  • Published by:  desk news

जोधपूर, 8 ऑगस्ट : रेल्वे स्टेशनवर (Railway station) स्थानिकांना सापडलेला एक अज्ञात आणि मूकबधिर तरूण (mute and deaf man) नेमका कुठला आहे, याचा अखेर शोध लागला. या तरूणाला काहीही ऐकता किंवा बोलता येत नसल्यामुळे त्याची ओळख पटवणं स्थानिकांना कठीण झालं होतं. गेल्या 13 महिन्यांपासून (13 months) बाल कल्याण समिती त्याचा सांभाळ करत होती आणि त्याच्या प्रत्येक बारीकसारीक हालचाली पाहून त्याचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करत होते.

पत्ता सापडण्यात अडचणी

साधारण 13 महिन्यांपूर्वी राजस्थानच्या जोधपूर रेल्वे स्टेशनवर एक मूकबधिर तरूण नागरिकांना सापडला. या तरुणाचं नाव लोकांनी गोपी ठेवलं. शिक्षण न झालेला, बोलता किंवा ऐकू न येणारा गोपी आपल्या घराचा पत्ता सांगणार तरी कसा, असा प्रश्न सामान्यांना पडला होता. त्याला वेगवेगळी चित्रं कॉम्प्युटरवर आणि मोबाईलवर दाखवून तो काही प्रतिसाद देतो का, याची लोक वाट पाहत होते. मात्र तो कशालाच प्रतिसाद देत नव्हता.

अखेर प्रतिसाद मिळाला

बजरंगी भाईजान या सिनेमातील मुलगी जशी काश्मीरचा फोटो आणि गावी जाणारी बस पाहून खूश झाली होती, तसाच हा गोपी सुवर्ण मंदिराचा फोटो पाहून खूश झाला. ते पाहून बाल कल्याण समितीचे सदस्य त्याला पंजाबमध्ये घेऊन गेले. सुवर्ण मंदिराच्या परिसरात त्याला फिरवण्यात आलं, आजूबाजूच्या परिसरात नेण्यात आलं. मात्र त्याने कशालाही प्रतिसाद दिला नाही.

त्यानंतर जेव्हा हे सगळे अमृतसर बस स्टॉपवर आले, तेव्हा एका बसकडे पाहून तो हसत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तातडीने त्या बसकडे धाव घेतली. सर्वजण जेव्हा गोपीला घेऊन त्या बसच्या जवळ गेले, तेव्हा बसच्या ड्रायव्हरनं गोपीला ओळखलं आणि तो आपल्या गावचा असल्याचं सांगितलं. बसमधील प्रवाशांनीदेखील गोपीला ओळखलं आणि गावातल्या लोकांना फोन करून याची माहिती देऊ लागले.

हे वाचा -दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरक्षा वाढवली, बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर अलर्ट

त्याच बसमधून गोपीला घेऊन सर्वजण गावी पोहोचले. तेव्हा बसमधून गोपी उतरल्या उतरल्या गावकऱ्यांनी हार घालून त्याचं स्वागत केलं. त्याचवेळी त्याची आई शेतातून लाकडांची मोळी डोक्यावर घेऊन येत होती. आपल्या मुलाला समोर पाहून आईला काय करू न काय नको, असं झालं होतं. घरातून गायब झालेला गोपी अशा प्रकारे 2 वर्षांनी पुन्हा आपल्या घरी परत आला.

First published:

Tags: Punjab, Rajasthan