भारतात वेगाने वाढतेय मुस्लिमांची संख्या, 2050 मध्ये होणार जगात सर्वाधिक!

भारतात वेगाने वाढतेय मुस्लिमांची संख्या, 2050 मध्ये होणार जगात सर्वाधिक!

भारतात 2050 पर्यंत मुस्लिमांची संख्या वेगाने वाढणार आहे. असं असलं तरी भारतात हिंदूच बहुसंख्य राहणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 13 फेब्रुवारी :  जगात सध्या ख्रिश्चन धर्मीयांची संख्या सर्वात जास्त आहे. मात्र 2050 पर्यंत जगाच्या लोकसंख्येचा नकाशा पूर्णपणे बदलून जाणार आहे. वर्ल्ड रिलीजन डेटाबेस आणि प्यू रिसर्च सेंटर यांनी केलेल्या अभ्यासात अनेक महत्त्वाच्या गोष्टी पुढे आल्या आहेत. या दोन संस्थांनी 1910 ते 2010 या 100 वर्षातल्या विविध धर्म मानणाऱ्या लोकांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी हे निष्कर्ष जाहीर केले आहेत. गेल्या 100 वर्षात इस्लाम धर्मियांची संख्या सर्वात जास्त वाढली. तर त्या खालोखाल नास्तिकांची संख्याही वाढली आहे.

भारतात 2050 पर्यंत मुस्लिमांची संख्या वेगाने वाढणार आहे. असं असलं तरी भारतात हिंदूच बहुसंख्य राहणार आहेत. मात्र जगात सर्वात जास्त मुस्लिम धर्मियांची संख्या ही भारतात राहणार असल्याचंही अभ्यासात आढळून आलं आहे. सध्या इंडोनेशिया हा जगात सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. तर दुसरा क्रमांक भारताचा लागतो.

कशी आहे अभ्यासाची आकडेवारी?

वर्ल्ड रिलीजन डेटाबेस च्या अहवालानुसार जगात 1910 मध्ये एकूण लोकसंख्येच्या 34.8 टक्के लोक ख्रिश्चन होते. 2010 मध्ये ही टक्केवारी घसरून 32.8 टक्के एवढी झाली. तर मुस्लिमांचं प्रमाण 1910 मध्ये 12.6 टक्के एवढं होतं. 2010 मध्ये ते प्रमाण वाढून 22.5 टक्के एवढं झालं आहे.

तर हिंदूंच्या लोकसंख्येतही वाढ झालीय. 1910 मध्ये हिंदूंची संख्या 12.7 टक्के एवढी होती. ती 2010मध्ये वाढून 13.8 टक्के एवढी झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नास्तिकांची संख्या 1910 मध्ये फक्त 0.2 टक्के एवढी होती. ही संख्या वाढून 2010मध्ये 9.8 टक्के एवढी झाली आहे.  चीनमध्ये कम्युनिष्ट सत्ता असल्याने धर्म मानणाऱ्यांच्या संख्येत घसरण झालीय. 1910मध्ये त्यांचं प्रमाण 22.2 टक्के एवढं होतं. 2010मध्ये ते प्रमाण 6.3 टक्के एवढं राहिलं आहे.

प्यू रिसर्च सेंटर ने 2017 मध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात 2015 पर्यंतची आकडेवारी दिली होती. त्यात ख्रिश्चन धर्मियांची जगात सर्वाधिक 230 कोटी होती. त्यानंतर मुस्लिम 180 कोटी तर हिंदू 110 कोटी असल्याचं सांगण्यात आलं होतं.

या अहवालानुसार जगभर ख्रिश्नांची संख्या 31.2 टक्के, मुस्लिम  24.1 टक्के तर हिंदूंची टक्केवारी 15.1 एवढी होती. नास्तिकांची संख्या जगात 16 टक्के एवढी आहे. लोकसंख्या वाढीचं प्रमाण असच राहिलं तर 2050 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही मुस्लिमांची राहणार आहे. तर आता बहुसंख्य असलेला ख्रिश्चन समाज दुसऱ्या क्रमांकावर राहिल. भारतात हिंदू बहुसंख्य राहणार असले तरी जगातले सर्वाधिक मुसलमान हे भारतात राहणार आहे. त्यामुळे इंडोनेशियाच्या भारत पुढे जाणार आहे.

मुस्लिमांची लोकसंख्या वाढण्याचं कारण काय?

धर्मांतरणामुळे मुस्लिमांची संख्या वाढल्याचा सर्वत्र समज आहे. मात्र या अभ्यास अहवालात मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचं खरं कारण हे मुस्लिमांमधला असलेला सर्वाधिक जन्मदर आणि घटलेला मृत्यूदर आहे असं आढळून आलंय. धर्मांतरणाचं प्रमाण हे फक्त 0.3 टक्के एवढं आहे असंही आढळून आलंय.

VIDEO : राहुल गांधींची गळाभेट ते राफेल, मोदींचं लोकसभेतील UNCUT भाषण

First published: February 13, 2019, 6:33 PM IST

ताज्या बातम्या