चीनमध्ये लाखो मुस्लीम बंदिवान पण इम्रान खान म्हणतात, मला काहीच माहीत नाही

चीनमध्ये लाखो मुस्लीम बंदिवान पण इम्रान खान म्हणतात, मला काहीच माहीत नाही

चीनने झिजियांग प्रांतामध्ये या अल्पसंख्याक विगर मुस्लीम लोकांसाठी एक वसाहतच बनवली आहे. या वसाहतीत त्यांना बंदिवासात ठेवण्यात आलं आहे. पण ही वसाहत म्हणजे प्रशिक्षण केंद्र आहे, असा चीनचा दावा आहे. चीनमधले हे विगर मुस्लीम लोक तुर्की भाषा बोलतात आणि ते मध्य आशियाई देशांशी आपलं नातं मानत आले आहेत.

  • Share this:

इस्लामाबाद, 29 मार्च : मसूद अझरवर जागतिक बंदी घालायला चीनने विरोध केला आहे. पण एकीकडे पाकिस्तानची पाठराखण करायची आणि दुसरीकडे १० लाख पाकिस्तानी मुस्लिमांना बंदिवासात ठेवायचं, अशी चीनची दुटप्पी भूमिका आहे, अशी टीका अमेरिकेने केली होती.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पत्रकारांनी याबददल विचारलं तेव्हा इम्रान खान म्हणाले, 'मला या मुस्लीम लोकांबद्दल काहीच माहीत नाही'

चीनने झिजियांग प्रांतामध्ये या अल्पसंख्याक विगर मुस्लीम लोकांसाठी एक वसाहतच बनवली आहे. या वसाहतीत त्यांना बंदिवासात ठेवण्यात आलं आहे. पण ही वसाहत म्हणजे प्रशिक्षण केंद्र आहे, असा चीनचा दावा आहे.

चीनमधले हे विगर मुस्लीम लोक तुर्की भाषा बोलतात आणि ते मध्य आशियाई देशांशी आपलं नातं मानत आले आहेत.

चीनच्या मदतीमुळे मौन ?

पाकिस्तानी पुरुष बंदिवासात असलेल्या त्यांच्या पत्नी आणि मुलांना वाचवण्यासाठी चीनला गेले होते. इम्रान खान यांना याबद्दलही विचारण्यात आलं पण याबद्दलही मी काहीच ऐकलेलं नाही, असं ते म्हणाले.

चीन आणि पाकिस्तानमध्ये व्यावहारिक संबंध असल्याने तुम्ही या प्रश्नावर मौन बाळगलं आहे का, असंही इम्रान खान यांना विचारण्यात आलं. त्यावर इम्रान खान म्हणाले, मी एवढंच सांगू शकतो की पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी चीन म्हणजे ताजीतवानी हवा आहे. त्यांनी आम्हाला खूप मदत केली आहे.

मुस्लीम विरुद्ध चिनी संघर्ष

विगर मुस्लिमांच्या बद्दल जर काही बोलायचंच असेल तर मी प्रसारमाध्यमांशी न बोलता थेट चीनशी बोलेन, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

झिंजियांग प्रांतात अल्पसंख्याक विगर मुस्लीम आणि हान चिनी लोकांमध्ये वर्षानुवर्षं संघर्ष सुरू आहे. या संघर्षात शेकडो मुस्लीम लोक मारले गेले आहेत. या विगर मुस्लीम लोकांच्या फुटीरवादी कारवायांमुळे चीनमध्ये अशांती आहे, आहे, असं चीनचं म्हणणं आहे तर विगर मुस्लीम लोकांच्या धर्म आणि संस्कृतीवर चिनी आक्रमण होतं आहे, अशी या मुस्लिमांची तक्रार आहे.

=============================================================================================================================================

प्रियांका गांधींचा थेट अयोध्येतून मोदींवर हल्लाबोल; काय म्हणाल्या पाहा VIDEO

First published: March 29, 2019, 6:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading