माणुसकीचा आदर्श : एका हिंदूचा जीव वाचविण्यासाठी मुस्लिम तरुणाने सोडला 'रोजा'!

माणुसकीचा आदर्श : एका हिंदूचा जीव वाचविण्यासाठी मुस्लिम तरुणाने सोडला 'रोजा'!

जगात फक्त एकच धर्म आहे आणि तो धर्म आहे माणुसकीचा. आसामच्या पानुल्लाहने हिंदू-मुस्लिम एकतेचं दर्शन घडवत रक्तदानाचं आवाहन केलंय.

  • Share this:

गुवाहाटी 12 मे : सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत महिनाभर उपवास करण्याला मुस्लिम धर्मात अत्यंत महत्त्व आहे. त्याचं अतिशय काटोकोरपणे पालन केलं जातं. दया, क्षमा, शांती, प्रेम हीच प्रत्येक धर्माची शिकवण असते. आसाममधल्या एका मुस्लिम तरुणाने धर्माची ही खरी शिकवण प्रत्यक्षात आचरणात आणली आणि उपवास सोडत एका हिंदू तरुणाचा जीव वाचवत माणूसकीच्या धर्माचं जगाला दर्शन घडवलं.

आसामच्या मंगलदोई इथं पानुल्लाह अहमद आणि तापश भगवती हे दोन मित्र रक्तदानाशी संबंधित एका फेसबुक पेजचे सदस्य आहेत. पानुल्लाह यांना एक फोन आला आणि ट्युमरचं ऑपरेशन असलेल्या एका रुग्णाला रक्त पाहिजे असल्याचं सांगितलं. रोजा सुरु असतानाही त्याने पहिले हॉस्पिटलमध्ये धाव घेतली आणि रक्तदान करणार असल्याचं सांगितलं. रोजा सुरू असल्याने त्याने पहिले जेवण केलं आणि नंतर रक्तदान केलं. त्याच्या या कृतीने हॉस्पिटलमधले डॉक्टरही भारावून गेलेत.रंजन गोगोई हा तरुण ट्युमरच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये भरती होता. त्याला B या रक्ताची गरज होती. या रक्तगटाचा दाता मिळावा  यासाठी पानुल्लाह आणि तापश यांनी खूप प्रयत्न केली मात्र दाता काही मिळाला नाही. त्यामुळे पानुल्लाहने स्वत:च रक्तदान करण्याचा निर्णय घेतला.

रक्तदान करण्याआधी त्याने आपल्या समाजातल्या ज्येष्ठ व्यक्तिंचं मार्गदर्शनही घेतलं. त्यांनीही त्याला सर्वात श्रेष्ठ धर्म हा माणुसकीचाच असल्याचं सांगतलं. त्यानंतर त्याने रक्तदान करण्यासाठी रोजा सोडला आणि रक्तदान केलं. पानुल्लाह आणि तापश हे दोघेही एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात. त्यांच्या या  श्रेष्ठ दानाचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय.

आरोग्य उत्तम असलेल्या सर्वांनी मतदान करावं असं आवाहन पानुल्लाह आणि तापश यांनी केलंय. पवित्र रमजान महिन्यात पानुल्लाहने जो सामाजिक सद्भावना आणि माणूसकीचा धडा घालून दिला तो सर्वांनाच प्रेरणा देणारा ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2019 08:55 PM IST

ताज्या बातम्या