उज्जैन, 16 डिसेंबर: उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात (Mahakal Temple)भस्म आरती दरम्यान एकच गोंधळ उडाला. बनावट आयडी(Fake ID) दाखवून एक युवकाने आपल्या प्रेयसीसोबत(girlfriend) महाकाल मंदिरात प्रवेश केला. हा तरुण मुस्लिम समाजाचा असून, तो एका हिंदू मुलीसोबत येथे आला होता. मंदिर समितीच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी केली आणि त्यानंतर तरुणाला अटक करण्यात आली आहे.
महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाच्या भस्म आरतीमध्ये अल्पसंख्याक समाजातील तरुणाने बनावट आधारकार्ड दाखवून प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. मंदिर समितीने हे प्रकरण पोलिसांकडे सोपवले आहे. महाकाल पोलीस ठाण्यात कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्याच्यासोबत असलेल्या तरुणाची आणि तरुणीची चौकशी करण्यात येत आहे.
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात भस्म आरतीच्या दर्शनादरम्यान बनावट आयडी असलेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. तरुणाकडून अभिषेक दुबे याच्या नावाचे बनावट आधार कार्ड जप्त करण्यात आले आहे. तरुणाचे खरे नाव मोहम्मद युनूस उल्लाह असल्याचे सांगण्यात येत आहे. हा तरुण कर्नाटकचा रहिवासी आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा तरुण त्याची मैत्रिण खुशबू दुबेसोबत महाकालेश्वर मंदिरात भस्म आरती दर्शनासाठी आला होता. तेथे त्याने अभिषेक दुबे यांच्या नावाचे बनावट ओळखपत्र दाखवून मंदिरात प्रवेश केला.
मंदिर समितीच्या लोकांना त्याच्यावर संशय आला असता, त्याच्या ओळखपत्र पाहिले. परंतु, तो वेगळा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर मंदिर समितीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास आता सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Girlfriend, Madhya pradesh, Muslim, Temple