...म्हणून मुस्लीम नेत्यांनी केली निवडणुकांच्या तारखा बदलण्याची मागणी

मुस्लीम नेत्यांनी निवडणुकांच्या तारखांवर आता आक्षेप घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 11, 2019 02:20 PM IST

...म्हणून मुस्लीम नेत्यांनी केली निवडणुकांच्या तारखा बदलण्याची मागणी

नवी दिल्ली, 11 मार्च : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. देशभरात 7 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका होणार असून 23 मे रोजी निकाल लागणार आहे. पण, निवडणुकांच्या तारखांवरून मुस्लिमांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या तारखा या रमजान महिन्यात येतात. त्यामुळे मुस्लीम नेते आणि मौलवींनी निवडणूक आयोगाच्या हेतूवर शंका घेत तारखा बदलण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, कोलकाताचे महापौर आणि तृणमुल काँग्रेसचे नेते फिरहाद हाकिम यांनी ‘आम्ही निवडणूक आयोगाचा सन्मान करतो. आम्हाला आयोगाविरोधात काहीही बोलायचं नाही. पण, 7 टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुका बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या लोकांसाठी कठिण असतील. मतदानाच्या तारखा या रमजान महिन्यामध्ये असल्यानं निवडणुकीमध्ये मुस्लिमांना सर्वाधिक त्रास होईल. मुस्लीम रोजे ठेवणार आणि मतदान देखील करणार याची निवडणूक आयोगानं दखल घ्यावी’ असं म्हटलं आहे.


Loading... 
प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसची डोकदुखी वाढवली, सोलापुरातूनच लढण्याची घोषणा


तर, लखनौ ईदगाहचे इमाम मौलाना खालीद रशीद फिरंगी महली यांनी देखील मतदानाच्या तारखा या रमजान पूर्वी किंवा ईदनंतर ठेवण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे.

VIDEO: रजनीकांतचं उदाहरण देत उदयनराजे म्हणाले, 'This is My Style'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2019 02:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...