लखनऊ, 29 एप्रिल : उत्तर प्रदेशातील लाखीमपुर खीरी जिल्ह्यात एका मुस्लीम तरुणीने रोजा असतानाही रक्तदान केलं आहे. लिव्हरच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाला यामुळं मोठी मदत झाली. लिव्हरच्या आजाराशी झुंज देत असलेल्या विजय रस्तोगी यांचा ओ निगेटिव्ह रक्तगट आहे. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर रक्त चढवण्याची गरज होती. अशा परिस्थितीत अलीशा खान या त्यांच्यासाठी देवदूत बनून आल्या. रोजा इफ्तारनंतर लगेच त्यांनी रक्तदान केलं.
वियज रस्तोगी यांना गेल्या काही काळापासून लिव्हरचा त्रास होत आहे. जवळपास एक आठवड्यापूर्वी त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांचे हिमोग्लोबिन वेगानं कमी होत होतं. यामुळे डॉक्टरांनी त्यांना रक्ताची गरज असल्याचं सांगितलं. ओ निगेटिव्ह रक्तगट असल्यानं ते मिळणंही कठीण होतं. त्यातही लॉकडाऊनच्या काळात कुटुंबियांनी धावाधाव केली. शेवटी एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अलीशा खान यांचा रक्तगट ओ निगेटिव्ह असल्याची माहिती मिळाली.
ओ निगेटिव्ह रक्तगट असलेली व्यक्ती सापडली पण रमजानमधील पहिलाच दिवस होता. त्यामुळे या काळात ती रक्तदान करेल का असंही विजयच्या नातेवाईकांच्या मनात आलं. शेवटी त्यांनी फोन करून अलीशाकडे मदत मागितली. तेव्हा कोणतेही आढेवेढे न घेता अलीशा यांनी रक्तदान करण्याची तयारी दर्शवली.
हे वाचा : पॉझिटिव्ह - निगेटिव्ह - पॉझिटिव्ह! कोरोनाच्या चाचणीने रुग्णाच्या आयुष्याचा खेळ
रोजा इफ्तार झाल्यानंतर अलीशा रुग्णालयात गेली आणि तिनं रक्तदान केलं. हे रक्तदान करून आपल्याला कुणाचा तरी जीव वाचवता आला याचा आनंद आहे अशा भावना अलीशाने व्यक्त केल्या. विजय यांच्या मुलांनीही अलीशा यांचे आभार मानले. तसंच रक्त दिल्यानंतर विजयच्या तब्येतीत सुधारणा होत असून त्यांच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.
हे वाचा :
लॉकडाऊन करूनही चीन, इटलीला जमलं नाही ते भारताने केलं, 30 दिवसांत काय झालं?
संपादन - सूरज यादव
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.