'चांद से रोशन हो...' आजपासून रमझानच्या पवित्र महिन्याला सुरुवात

'चांद से रोशन हो...' आजपासून रमझानच्या पवित्र महिन्याला सुरुवात

भारतामध्ये रमझानच्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. तर जगातल्या अनेक देशांमध्ये रमझान कालपासूनच सुरू झाला.

  • Share this:

18 मे : भारतामध्ये रमझानच्या पवित्र महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. तर जगातल्या अनेक देशांमध्ये रमझान कालपासूनच सुरू झाला. पाकिस्तानमध्ये रमजानचा पहिला रोजा काल ठेवण्यात आला. काल संध्याकाळी पाकमध्ये पहिला इफ्तार पार पडला.

कराचीमध्ये सामोसे, पकोडे, जिलबी आणि विविध प्रकारचे कबाब. या सर्व पदार्थांचा खप चांगलाच वाढलाय. खरंतर पाकमध्येही काही शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या वर जातंय. पण त्याचा परिणाम रोजे ठेवणाऱ्यांवर दिसत नाहीये. आम्ही अल्लासाठी रोजे ठेवतो, त्याच्या आड काहीच येत नाही, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

'चांद से रोशन हो रमझान तुम्हारा, इबादत से भरा हो रोजा तुम्हारा' अशा शुभेच्छा या दिवसांमध्ये दिल्या जातात. रमझानचे हे दिवस म्हणजे सकारात्मका मिळवण्याचे दिवस असतात. आत्मपरिक्षण, संयम या सगळ्यांचा सांगड घालणार असा हा रमझानचा सण आहे.

रमझानचे महत्त्व

इस्लामी कालगणनेनुसार येणारा ९ वा महिना हा रमझानचा महिना. मुस्लीम धर्मियांसाठी विशेष महत्त्व दर्शवितो. या महिन्यात इस्लामचे श्रद्धावंत सूर्योदय ते सूर्यास्त कडक उपवास करतात. रमझान शब्दाची व्युत्पत्ती म्हणजे तो (ramz)रमझ या पासून तयार झाला, रमझ चा अर्थ आहे 'जाळणे'.

उन्हाळ्याच्या ऋतूमधील महिना अथवा या महिन्यातील उपासामुळे व्यक्तीची पापं जाळली जातात म्हणून याचं नाव रमझान. मुस्लिमांच्या धर्मातील ५ आधारस्तंभातील हा एक आधारस्तंभ आहे.

 

First published: May 18, 2018, 10:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading