Elec-widget

'हे' वाचल्यानंतर बलात्कार करण्याची हिम्मत होणार नाही; अशी दिली जाते शिक्षा!

'हे' वाचल्यानंतर बलात्कार करण्याची हिम्मत होणार नाही; अशी दिली जाते शिक्षा!

जाणून घेऊयात जगातील अन्य देशात बलात्काराच्या गुन्ह्यासाठी कोणत्या प्रकराची शिक्षा दिली जाते.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 डिसेंबर: हैदराबाद येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशात पुन्हा एकदा संतापाची लाट तयार झाली आहे. बलात्कारासारख्या गुन्हांमधील दोषींना कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी केली जात आहे. सोशल मीडिया असे की अन्य ठिकाणी बलात्कार करणाऱ्यांना परदेशातदिल्या जाणाऱ्या शिक्षा द्याव्यात अशी मते मांडली जातात. अनेक अरब देशांमध्ये बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाते. केवळ मुस्लीम देश नव्हे तर चीन आणि अन्य काही देश देखील अशा प्रकारे कठोर शिक्षा देतात.

हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर झालेल्या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला आहे. निर्भया प्रकरणानंतर बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जावी अशी मागणी करण्यात आली होती. आता पुन्हा अशीच मागणी केली जात आहे. या निमित्ताने जाणून घेऊयात जगभरातील अन्य देशात बलात्कारासारख्या गुन्ह्यांना कोणती शिक्षा दिली जाते. शरीयतमध्ये बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाते. अर्थात शरीयतमधील शिक्षा लागू करण्यासंदर्भात अनेक मतभेद आणि वाद आहेत. जम्मू्-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काही महिन्यांपूर्वी शरीयत कायदा लागू करण्याची मागणी केली होती. जाणून घेऊयात जगातील अन्य देशात कोणत्या प्रकराची शिक्षा दिली जाते.

शरीयतमध्ये बलात्कारासारख्या घटनेवर कठोर शिक्षा देण्याची तरतूद आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी सर्वांच्या समोर दोषींचा शिरच्छेद केला जातो. युएईमध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी सात दिवसांच्या आत फाशी दिली जाते. अखाती देशांमध्ये तर हात कलम करण्याची शिक्षा करण्याची तरतूद आहे. तर याच शरीयत कायद्यामध्ये महिलेने पुरुषाचा अपमान केल्यास तिला चाबकाचे 100 फटके देण्याची तरतूद आहे.

अफगाणिस्तान, इराण, इराक, पाकिस्तान, सौदी अरब, सुदान आणि यमन सारख्या देशात शरिया कायद्यानुसार शिक्षा दिला जाते. याशिवाय उत्तर कोरियामध्ये देखील बलात्कारातील दोषींच्या डोक्यात गोळी झाडली जाते. अशा प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपींवर कोणत्याही प्रकारच्या दया दाखवली जात नाही.

इराकमध्ये बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जाते. पण शिक्षा देण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. संबंधित आरोपीला तो मरेपर्यंत दगड मारले जातात. बलात्कारासारख्या गुन्ह्यांमध्ये दोषीला यातना दिल्या जातात. पोलंड सारख्या देशात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना डुकरांकडून चावण्याची शिक्षा दिली जात असे. अर्थात सध्या या कायद्यात बदल करण्यात आला असून संबंधित पुरुषाला नपुंसक केले जाते. इंडोनेशियात तर यापेक्षा कठोर अशी शिक्षा दिली जाते. येथे दोषींना नपुंसक करण्याबरोबरच त्यांच्यात महिलांचे हार्मोन्स देखील टाकले जातात.

Loading...

बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा देणाऱ्या देशांमध्ये चीनचा देखील समावेश आहे. चीनमध्ये बलात्कार करणाऱ्या अनेक दोषींना मृत्यूदंड दिला गेला आहे. चीनमध्ये अशा गुन्ह्यांसाठी कोर्टात खटला चालवला जात नाही. फक्त वैद्यकीय चाचणीत बलात्कार केल्याचे सिद्ध झाले की संबंधित आरोपीस मृत्यूदंड दिला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Rape
First Published: Dec 2, 2019 02:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...