IAS, IPSची परीक्षा देण्यासाठी हत्या प्रकरणातील कैदी जाणार विमानानं

IAS, IPSची परीक्षा देण्यासाठी हत्या प्रकरणातील कैदी जाणार विमानानं

हत्या प्रकरणातील आरोपीला UPSCची परीक्षा देण्यासाठी न्यायालयानं परवानगी दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे : जेलमध्ये असताना देखील अनेक कैद्यांनी आपली पदवी, शिक्षण पूर्ण केल्याची उदाहरणं समोर आली आहेत. पण, हत्या प्रकरणातील कैदी IAS, IPS बनण्यासाठी विमानानं जाणार असं तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? पण, न्यायालयानं हत्या प्रकरणातील आरोपीला IAS, IPSची परीक्षा देण्यासाठी विमानानं दिल्लीला जाण्याची परवानगी दिली आहे. यावेळी कैद्यासोबत असणाऱ्या पोलिसांचा खर्च हा जेल प्रशासन करणार हे विशेष.

कोण आहे हा आरोपी

इंफाळमधील बेंजी सध्या हत्या प्रकरणात दिल्लीच्या तुरूंगात शिक्षा भोगत आहे. हत्या प्रकरणातील सुनावणी दरम्यान 12 मे रोजी होणाऱ्या UPSC परीक्षेसाठी जामीन देण्यासाठी कैद्यानं न्यायालयाला विनंती केली. पण, आरोपी फरार होण्याची शक्यता जास्त असल्यानं जामीनाला पोलिसांनी विरोध केला. शिवाय, न्यायालयानं देखील जामीन नाकारला. त्यानंतर UPSCची परिक्षा देणार कशी असा सवाल उभा राहिला.

BJP – काँग्रेसला बहुमत न मिळाल्यास या पाच जणांच्या हाती सत्तेच्या चाव्या!

काय दिला न्यायालयानं निर्णय

शुक्रवारी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं बेंजी याला UPSCची परिक्षा देण्यासाठी परवानगी दिली. पण, ट्रेननं परीक्षेला गेल्यास परीक्षेसाठी उशीर होईल म्हणून 11 मे रोजी ( आज ) बेंजी इंफाळला विमानानं जाईल. त्यानंतर त्याला जवळच्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात येईल. 12 मे रोजी परीक्षा झाल्यानंतर 13 मे रोजी बेंजीला दिल्लीच्या तुरूंगामध्ये आणलं जाईल.

पण, बेंजीची घरची परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे पोलिसांचा विमान खर्च त्याला परवडणारा नाही याची न्यायालयात कल्पना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या प्रवासाचा खर्च हा जेल प्रशासन करेल असा आदेश न्यायालयानं दिला आहे. त्यामुळे विमानानं इंफाळला जाऊन UPSCची परीक्षा देणं आता बेंजीला शक्य होणार आहे.

VIDEO: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना धू-धू धुतलं, पोलिसांनीही केले हात साफ

First published: May 11, 2019, 2:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading