सासू आणि जावयाचं एकमेकांवर जडलं प्रेम; सासऱ्याचा काटा काढण्यासाठी निर्घृण खून

सासू आणि जावयाचं एकमेकांवर जडलं प्रेम; सासऱ्याचा काटा काढण्यासाठी निर्घृण खून

सासू आणि जावयाच्या अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या सासऱ्याचा खून करण्यात आला आहे.

  • Share this:

बांका, 14 डिसेंबर : भारतीय संस्कृतीत सासूला आईसमान दर्जा दिला जातो. पण बिहारमध्ये जावई- सासू या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये सासू आणि जावयाच्या अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या सासऱ्याचा खून करण्यात आला आहे. सासऱ्याच्या खुनाचा आरोप सासरच्या घरात राहणाऱ्या जावयावर केला आहे. ही घटना बांका जिल्ह्यातील रजौन पोलीस स्टेशन परिसरातील लौढिया गावची आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

मृत सासऱ्याचं नाव कलयुग पासवान असून त्यांच्या मोठ्या मुलीचा विवाह मुस्तफापुर येथील एका युवकाशी झाला होता. परंतु लग्नाच्या काही वर्षानंतरच जावई राजेश पासवान आपल्या सासऱ्यांच्या घरी राहू लागला. याकाळात जावयाने आपल्या सासूसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप राजेशवर आहे. त्यांच्या या अनैतिक संबंधाची चर्चा संपूर्ण गावभर झाली होती. तसेच घरातील सदस्यांना याबद्दल माहित होतं. लॉकडाऊनच्या काळात सासरा कलियुगसुद्धा लुधियानाहून आपलं काम संपवून स्वतःच्या घरी राहायला आला होता. घरी आल्यानंतर त्यांनी शेती करायला सुरूवात केली आणि पिकाची देखभाल करण्यासाठी त्यानं शेतातचं झोपडी बांधून तिथेच राहायला सुरुवात केली होती.

पण कलयुग घरात राहत असल्याने ते सासू जावयाच्या अनैतिक संबंधात बाधा ठरत होते. म्हणून शेवटी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप जावई राजेश पासवान यांच्यावर आहे. ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी सासू- जावयाच्या अनैतिक संबंधांमुळे सासऱ्याची हत्या झाल्याचं उघडपणे सांगितलं आहे.

यासंदर्भात बांका एसडीपीओ दिनेश चंद्र श्रीवास्तव यांनी सासऱ्याच्या हत्येची पुष्टी केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं आहे. रजौन येथे पोहोचून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितलं की अनैतिक संबंध आणि हत्येची अन्य कारणं लक्षात घेऊन चौकशी आणि तपास केला जाईल. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

Published by: News18 Desk
First published: December 14, 2020, 10:30 PM IST
Tags: biharcrime

ताज्या बातम्या