Home /News /national /

जेवायला बसत होते मोठा दीर आणि वहिनी.., अंधविश्वासातून महिलेने केली दोघांची हत्या

जेवायला बसत होते मोठा दीर आणि वहिनी.., अंधविश्वासातून महिलेने केली दोघांची हत्या

अंधश्रद्धेतून जादूटोणा केल्याचा आरोप करून निष्पाप लोकांच्या हत्यांचे प्रकार जिल्ह्यात सर्रास सुरू आहेत. आणखी एक धक्कादायक घटना गुमला जिल्ह्यातील चैनपूर प्रखंडच्या बुकमा गावातून समोर आली आहे. एका महिलेने आपल्या जेठ आणि जेठाणीची हत्या केली आहे. (Murder in Gumla)

पुढे वाचा ...
  गुमला (झारखंड), 23 एप्रिल : अंधश्रद्धेतून जादूटोणा केल्याचा आरोप करून निष्पाप लोकांच्या हत्यांचे प्रकार जिल्ह्यात सर्रास सुरू आहेत. आणखी एक धक्कादायक घटना गुमला जिल्ह्यातील चैनपूर प्रखंडच्या बुकमा गावातून समोर आली आहे. एका महिलेने आपल्या मोठा दीर आणि वहिनीची हत्या केली आहे. (Murder in Gumla) हत्येची घटना घडल्यानंतर आरोपी महिलेने चैनपूर पोलिस स्टेशन गाठले. तिने पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले आणि आपला गुन्हा कबूल केला आहे. सुमित्रा देवी (50 वर्ष) असे आरोपी महिलेचे नाव आहे. प्रकरण काय? आरोपी महिला सुमित्रा देवीने सांगितले की, तिची मुले अनेक दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे तिला आपल्या मोठा दीर लुंद्रा गाल बडाईक (वय 70 वर्षे) आणि वहिनी फुलमा देवी (65 वर्षे) यांनी आपल्या मुलाला आजारी केले असल्याचा संशय त्याला आला. यामुळे तिने काल रात्री दोघांची हत्या केली.
  गावातील लोकांनी सांगितले आहे की, शुक्रवारी दोन्ही मृतांनी गावात सांगितले होते की आरोपी सुमित्रा देवी त्यांना जादूटोणा करणारे म्हणत आहे. या विषयाला घेऊन गावात बैठक घेण्यात आली. स्थानिक पातळीवर या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. असे असतानाही रात्री मृत पती-पत्नी जेवणाच्या तयारीत असताना, आरोपी महिलेने कुऱ्हाडीने त्यांच्या मानेवर वार करत त्यांची हत्या केली.
  घटनेची माहिती मिळाल्यानंतर चैनपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानतर मृतदेह ताब्यात घेण्यात आले. नपूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्ण गुप्ता म्हणाले की, हत्येप्रकरणी जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. अंधविश्वासातून मोठा दीर आणि वहिनीची हत्या करण्यात आली आहे, अशी माहितीही गुप्ता यांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Jharkhand, Murder

  पुढील बातम्या