Home /News /national /

चिडवत असल्याच्या रागातून बारावीच्या विद्यार्थ्याकडून वर्गमित्राची हत्या, तमिळनाडूमधील घटना

चिडवत असल्याच्या रागातून बारावीच्या विद्यार्थ्याकडून वर्गमित्राची हत्या, तमिळनाडूमधील घटना

वर्गातले इतर विद्यार्थी त्याच्या चेहऱ्यावरून आणि त्याच्या  स्वभावावरून त्याला चिडवत असत.

वर्गातले इतर विद्यार्थी त्याच्या चेहऱ्यावरून आणि त्याच्या स्वभावावरून त्याला चिडवत असत.

वर्गातले इतर विद्यार्थी त्याच्या चेहऱ्यावरून आणि त्याच्या स्वभावावरून त्याला चिडवत असत.

    तामिळनाडू, 18 मे : आपण पाहतो, की लहान मुलं एकमेकांना बऱ्याच गोष्टींवरून चिडवत असतात. यामध्ये मग एखाद्याची सवय, त्याची शरीरयष्टी किंवा अन्य काही गोष्टींवरून त्याला चिडवलं जातं. ही चेष्टामस्करी एका मर्यादेपर्यंत ठीक असते; मात्र ही सीमा ओलांडल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu student murder) अशीच एक घटना घडली आहे. बारावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आपल्याच वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची हत्या केली आहे. वर्गातले इतर विद्यार्थी त्याच्या चेहऱ्यावरून आणि त्याच्या इंट्रोव्हर्ट (Introvert) स्वभावावरून त्याला चिडवत असत. ज्या मुलाची हत्या झाली, तोदेखील आरोपी मुलाला चिडवत असे. यातूनच हा प्रकार (Tamil Nadu Class 12th murder) घडला आहे. इंट्रोव्हर्ट असणाऱ्या आरोपी मुलाने आपल्या सर्व मित्रांना एका पार्टीच्या निमित्तानं एकत्र बोलावलं होतं. त्या ठिकाणी एका धारदार शस्त्राने त्याने आपल्या मित्रावर हल्ला केला. 'दैनिक भास्कर'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. बॉडी शेमिंगचे गंभीर परिणाम राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य डॉ. शरण्या जयकुमार यांनी या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. बॉडी शेमिंगमुळे (Tamil Nadu murder over body shaming) अल्पवयीन मुलाने अशा प्रकारचं पाऊल उचलणं गंभीर असल्याचं त्या म्हणाल्या. बॉडी शेमिंगमुळे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. यामुळे बॉडी डिसमॉर्फिक डिसऑर्डर (Body Shaming problems) या आजाराची लागण होते. यामुळे मुलांना मोठ्या प्रमाणात राग येतो. यातूनच अशा प्रकारच्या घटना घडतात, असं त्या म्हणाल्या. बॉडी शेमिंगबाबत धक्कादायक अहवाल बॉडी शेमिंगबाबत करण्यात आलेल्या एका पाहणीच्या अहवालातून धक्कादायक माहिती (Body Shaming survey) समोर आली आहे. 90 टक्के महिलांनी बॉडी शेमिंग ही सामान्य बाब असल्याचं म्हटलं आहे. 84 टक्के महिलांनी पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक बॉडी शेमिंगला सामोरं जावं लागत असल्याचं म्हटलं आहे. 47.5 टक्के मुली/महिलांना शाळेत वा कामाच्या ठिकाणी बॉडी शेमिंगचा (Body Shaming at school) सामना करावा लागला. 32.5 टक्के महिलांनी सांगितलं, की त्यांचे मित्र त्यांच्या वजनासंबंधी, रंगासंबंधी वा केसांविषयी निगेटिव्ह कमेंट्स करतात. 66 टक्के महिलांना असं वाटतं, की आत्मविश्वास येण्यासाठी चांगलं दिसणं गरजेचं आहे. बॉडी शेमिंगचे दुष्परिणाम बॉडी शेमिंगमुळे कोणतीही व्यक्ती तणावाखाली जाऊ शकते. यामुळेच पुढे डिप्रेशन होण्याची शक्यताही वाढते. कित्येक वेळा या व्यक्ती इतरांपासून वेगळ्या होतात. तसेच, मनामध्ये कायम निगेटिव्ह विचार येऊ लागतात. बॉडी शेमिंगला बळी पडलेली व्यक्ती आत्महत्येचा विचारही करू लागते. यामुळे तज्ज्ञ अशा व्यक्तींना पॉझिटिव्ह राहण्याचा सल्ला देतात. इतरांचं आपल्याविषयीचं मत ऐकून स्वतःबाबत चुकीचा समज (how to tackle Body Shaming) करून घेऊ नका. तसंच, आपल्या मनात काय आहे हे इतरांना वेळीच सांगा. आपल्या मानसिक आरोग्याविषयी मदत घेण्यास संकोच बाळगू नका, अशा प्रकारचे सल्ले तज्ज्ञ देतात. दरम्यान, पोलिसांनी तमिळनाडूमधल्या या मुलाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हा मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्याला सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
    First published:

    पुढील बातम्या