• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • नदीच्या बाजूला आढळला 5 वर्षांच्या मुलीचा मृतदेह अन् काळी जादू करणाऱ्या वस्तू!

नदीच्या बाजूला आढळला 5 वर्षांच्या मुलीचा मृतदेह अन् काळी जादू करणाऱ्या वस्तू!

कुटुंबातल्या पाच भावंडांमध्ये सर्वांत लहान असलेल्या या मुलीचं सोमवारी रात्री झोपेत असताना अज्ञात लोकांनी अपहरण केलं होतं.

कुटुंबातल्या पाच भावंडांमध्ये सर्वांत लहान असलेल्या या मुलीचं सोमवारी रात्री झोपेत असताना अज्ञात लोकांनी अपहरण केलं होतं.

कुटुंबातल्या पाच भावंडांमध्ये सर्वांत लहान असलेल्या या मुलीचं सोमवारी रात्री झोपेत असताना अज्ञात लोकांनी अपहरण केलं होतं.

 • Share this:
  आसाम, 11 ऑगस्ट : आपल्या देशात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असला तरीही आजच्या आधुनिक काळातही काही लोक गुप्तधन, जादूटोणा यावर विश्वास ठेवतात. तांत्रिक-मांत्रिकांच्या (Occult practitioner) बोलण्याला भुलून नरबळीसारखे अघोरी प्रकार करण्यासाठी तयार होतात. अशा प्रकारांमध्ये अनेकदा लहान मुला-मुलींचा बळी (Human sacrifice) दिल्याचं आढळून येतं. आसाममध्येही (Assam) नुकतीच अशी एक घटना उघडकीस आली असून, पाच वर्षांच्या एका मुलीची (5 years Old Girl) हत्या करण्यात आली आहे. हा नरबळीचा प्रकार असावा असा संशय पोलिसांनी (Police) व्यक्त केला आहे. आसामच्या चराईडो जिल्ह्यात (Charaideo District) ही घटना घडली आहे. एका चहाच्या मळ्यात (Tea Estate) राहणाऱ्या एका कुटुंबातल्या पाच भावंडांमध्ये सर्वांत लहान असलेल्या या मुलीचं सोमवारी रात्री झोपेत असताना अज्ञात लोकांनी अपहरण केलं होतं. तिच्या मोठ्या बहिणीनं मंगळवारी सेफराई पोलीस ठाण्यात आपली लहान बहीण हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मंगळवारी रात्री या मुलीचा मृतदेह (Dead Body) सिंगलू नदीत (Singlu River) सापडला. त्या वेळी नदीच्या काठावर तांत्रिक विधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही वस्तू आणि अस्थिरक्षा असलेलं एक लाल कापड सापडलं. त्यामुळे हा नरबळीचा प्रकार असू शकतो, असा संशय पोलिसांना आला. या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (Post Mortem) पाठवण्यात आला आहे, असं वृत्त 'द हिंदू'ने दिलं आहे. या प्रकरणी एका तांत्रिकाला अटक करण्यात आली असून, या प्रकरणातला मुख्य आरोपी असलेल्या मुख्य मांत्रिकाला पकडण्यासाठी शोध सुरू आहे. तसंच या मुलीच्या वडिलांसह दहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, यात मिळालेले पुरावे पाहता नरबळीची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीही आदिवासीबहुल भागातल्या चहाच्या मळ्यांमध्ये नरबळीच्या घटना घडल्या आहेत. 2016 मध्येही एका चहाच्या मळ्यातली चार वर्षांची एक मुलगी बेपत्ता झाली होती. काही दिवसांनी तिचा मृतदेह सापडला होता, असंही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
  First published: