Home /News /national /

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचे खटले दाखल करायला पाहिजेत; उच्च न्यायालयानं व्यक्त केला संताप

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचे खटले दाखल करायला पाहिजेत; उच्च न्यायालयानं व्यक्त केला संताप

Madras High Court on EC : देशात निवडणूक मोर्चे आणि प्रचार सभाचं आयोजन करण्यात येत होतं, तेव्हा तुम्ही परग्रहावर होता का? असा तिखट सवालही न्यायालयाने आयोगाला विचारला आहे.

    चेन्नई, 26 एप्रिल: सध्या देशात कोरोना विषाणूचा संसर्ग आणि निवडणुकीचा जोर वाढतच चालला आहे. देशात दररोज साडे तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होतं आहे. असं असताना अनेक राजकीय नेते निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना एकत्रित करून मोठ्या संख्येनं शक्तिप्रदर्शन करत आहेत. त्यामुळे मद्रास हायकोर्टानं निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात असंख्य लोकांचा मृत्यू होतं आहे. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांना प्रचार सभांना आणि 'रोड शो'ला परवानगी दिल्याबद्दल मद्रास हायकोर्टानं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना फटकारलं आहे. मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी एका सुनावणीदरम्यान 'निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर खूनाचे खटले दाखल व्हायला पाहिजेत,' अशा शब्दांत कानउघडणी केली आहे. न्यायालयीन घडामोडीबाबत वार्तांकन करणारी वेबसाइट लाइव्ह लॉच्या मते, मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी भारतीय निवडणूक आयोगाला म्हटलं की, "कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेसाठी तुमची संस्था जबाबदार आहे." 2 मे पर्यंत कोरोना प्रोटोकॉलचं पालन करण्याबाबत आयोगानं ठोस योजना न आणल्यास, निवडणुकीच्या सर्व कार्यक्रमांवर तात्काळ निर्बंध लागू केले जातील, असा सक्त इशारा मद्रास हायकोर्टानं दिला आहे. जीवंत राहाल तरचं लोकशाहीचा हक्क बजावाल - हायकोर्ट मद्रास हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी आयोगाला सांगितलं की, 'लोकांचा जीव सर्वाधिक महत्त्वाचा आहे; पण या गोष्टीची आठवण घटनात्मक अधिकाऱ्यांना करून द्यावी लागतेय, ही चिंताजनक बाब आहे. लोकं जिवंत राहतील तेव्हाच ते आपल्या लोकशाही हक्कांचा लाभ घेऊ शकतील.' हे ही वाचा-'प्रचार करा मात्र सांभाळून, अन्यथा...', निवडणूक आयोगानं नेत्यांना दिला इशारा मुख्य न्यायाधीशांनी पुढं म्हटलं की, 'सध्याची स्थिती अस्तित्वाची आणि सुरक्षिततेची आहे. यानंतर सर्वकाही येतं. देशात निवडणूक मोर्चे आणि प्रचार सभाचं आयोजन करण्यात येत होतं, तेव्हा तुम्ही परग्रहावर होता का? असा तिखट सवालही न्यायालयाने आयोगाला विचारला आहे. या सुनावणीदरम्यान राज्य आरोग्य सचिवांशी सल्लामसलत केल्यानंतर, हायकोर्टानं निवडणूक आयोगाला 30 एप्रिल पर्यंत मतमोजणीच्या दिवशी लागू करण्यात येणाऱ्या कोरोना प्रोटोकॉलबाबतची योजना सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Assembly Election 2021, Chennai, Election commission, High Court

    पुढील बातम्या