बैतूल, 09 जुलै: एका ग्राम सभेनं (Gram sabha) जिल्हाधिकाऱ्याला (District Collector) 25 लाखांचा दंड (25 Lac Fine) ठोठावल्याची अजब घटना समोर आली आहे. ही घटना समोर येताच, अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. तर काहीजणानं संबंधित आदेश योग्य असल्याचं म्हटलं आहे. ग्राम सभेनं एकमतानं हा आदेश पारित (Issue order) केला असून याची एक प्रत संबंधित जिल्हाधिकाऱ्याला आणि जिल्हा सत्र न्यायालयाला देखील पाठवली आहे. ग्राम सभेच्या निर्णयाची जिल्ह्यात चर्चा सुरू असून जिल्हाधिकाऱ्याला ग्राम सभा कसं काय दंड ठोठावू शकते किंवा आदेश देऊ शकते, याबाबत चर्चा सुरू आहे.
संबंधित घटना मध्य प्रदेशातील बेतूल येथील आहे. चिचोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेहरा विकासखंड शाहपूर ग्राम सभेनं एक आदेश जारी करत थेट जिल्हाधिकाऱ्यांना 25 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण समोर येताच स्वतः जिल्हाधिकारी देखील चक्रावले आहे. हे प्रकरण आता न्यायालयात गेलं आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
हेही वाचा-VIDEO: लग्न दिराचं आणि चर्चा मात्र वहिनीची; पाहा मंडपात असं नेमकं काय घडलं?
नेमकं प्रकरण काय आहे?
जानेवारी 2021 मध्ये, चिचोली पोलिसांनी सेहरा विकासखंड शाहपूर गावातील सियाराम नावाच्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात नेलं होतं. याठिकाणी पोलिसांनी त्याच्यावर हत्येची कबुली देण्यासाठी दबाव आणला होता. तसेच या प्रकरणातून सही सलामत सुटायचं असेल तर दहा हजार रुपये दे, अशी मागणी पोलिसांनी केली होती. पोलिसांच्या या दबावाला कंटाळून सियाराम यानं घरातील किटकनाशकं पिऊन आत्महत्या केली. यानंतर सियाराम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण याठिकाणी त्यांची प्राणज्योत मालवली.
हेही वाचा-VIDEO: वाहतूक पोलिसाशी भररस्त्यात वाद:धमकावणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ढसाढसा रडवलं
पती सियाराम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीनं न्यायासाठी पोलीस अधिक्षकांकडे धाव घेतली. पण तिला न्याय मिळाला नाही. त्यामुळे तिने तिचा हा प्रश्न गावातील पारंपरिक ग्राम सभेत मांडला. यानंतर संबंधित आदिवासी महिलेची अवस्था पाहून ग्राम सभेनं एकमतानं एक आदेश पारित केला. ज्यामध्ये बैतूल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमनबीर सिंह यांनी पीडित महिलेला 25 लाखांची नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश दिला. ग्राम सभेनं या आदेशाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयासोबत जिल्हा सत्र न्यायालयातही पाठवली आहे. प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. पण ग्राम सभेच्या या अजब फर्मानामुळे जिल्ह्यात सर्वत्र चर्चा रंगत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Madhya pradesh