Home /News /national /

कर्जाचे पैसे मागायला आलेल्या महिलेला गमवावा लागला जीव, शेजाऱ्यांकडून मृतदेहासोबत धक्कादायक कृत्य

कर्जाचे पैसे मागायला आलेल्या महिलेला गमवावा लागला जीव, शेजाऱ्यांकडून मृतदेहासोबत धक्कादायक कृत्य

आरती देवी संध्याकाळी फिरायला बाहेर पडल्या होत्या आणि यानंतर त्या बेपत्ता झाल्या होत्या

    छपरा, 5 जुलै : बिहारमधील छपरा (Chhapra Bihar) येथे शेजाऱ्यांनी महिलेला मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अमनौर पोलीस ठाणे (Amnaur Police Station) परिसराच्या एका गावातील आहे. मृत महिलेचे नाव आरती देवी असे आहे. ती त्याच गावातील रहिवासी आहे. हत्येनंतर आरोपींनी मृतदेह घरातील किचनमध्ये लपवून (Woman dead body found in kitchen) ठेवला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. काय आहे संपूर्ण घटना - दरम्यान, या घटनेमागे आर्थिक व्यवहाराचे कारण सांगितले जात आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, आरती देवी संध्याकाळी फिरायला बाहेर पडल्या होत्या आणि यानंतर त्या बेपत्ता झाल्या होत्या. तर दुसऱ्या दिवशी शेजारच्या श्रीकांत सिंग यांच्या घरातील किचनमध्ये आरती देवीचा थेट मृतदेहच सापडला. श्रीकांत सिंह याच्या कुटुंबीयांनी आरती देवी यांच्याकडून 20 हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सोमवारी संध्याकाळी फिरत असताना ती कर्जाची रक्कम मागण्यासाठी श्रीकांत सिंग यांच्या घरी आली. त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. श्रीकांत सिंह याच्या कुटुंबीयांनी तिची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह हा किचनमध्ये लपवला होता. तर दुसरीकडे ती बेपत्ता झाल्यानंतर गावातील लोक रात्रभर तिचा शोध घेत होते. गावकऱ्यांना संशय आल्याने त्यांनी माहिती देऊन पोलिसांना बोलावून श्रीकांत सिंग यांच्या घराची झडती घेतली असता किचनला कुलूप लावलेले दिसले. घरातील सदस्यांना कुलूप तोडण्यास सांगितले असता त्यांनी तसे करण्यास नकार दिला. यानंतर उपस्थितांना आणखीनच संशय आला. हेही वाचा - Jyotishacharya Murder : प्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर यांची हत्या, शिष्याच्या वेशात आलेल्या दोघांनी केले 70 हून अधिक वार त्यानंतर पोलिसांनी बळजबरीने किचनचे कुलूप तोडले. यानंतर जे दिसले त्यामुळे सर्वच जण थक्क झाले. कुलूप तोडल्यानंतर आरती सिंह मृतावस्थेत आढळली. हे दृश्य पाहून ग्रामस्थांचा संताप उसळला आणि त्यांनी गुन्हेगारांच्या घराला घेराव केला. इतकेच नव्हे तर जमावाने पोलिसांविरोधात निदर्शने करत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bihar, Loan, Murder, Woman

    पुढील बातम्या