TV शोमध्ये आरोपीने मर्डरचा गुन्हा केला मान्य, पोलिसांनी स्टुडिओतूनच केली अटक

TV शोमध्ये आरोपीने मर्डरचा गुन्हा केला मान्य, पोलिसांनी स्टुडिओतूनच केली अटक

न्यूज चॅनेलवर शोमध्ये चर्चेसाठी आल्यानंतर एकाने आपण हत्या केल्याचं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला स्टुडिओमधूनच अटक केली.

  • Share this:

चंदिगढ, 15 जानेवारी : न्यूज चॅनेलवर शोमध्ये चर्चेसाठी आल्यानंतर एकाने आपण हत्या केल्याचं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला स्टुडिओमधूनच अटक केली. दोन आठवड्यापूर्वी 31 डिसेंबरला चंदिगडमधील एका हॉटेलमध्ये महिलेची हत्या झाली होती. पोलिस या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत होते. पोलिसांना आरोपी टीव्ही चॅनेलवर मुलाखतीवेळीच सापडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलिसांना 1 जानेवारी रोजी इंडस्ट्रियल परिसरातील हॉटेलच्या रूममध्ये 24 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. नर्स म्हणून काम करणाऱ्या सरबजित कौरची हत्या करून मारेकरी पळून गेल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं.

टीव्ही चॅनलवर मनिंदरने बोलताना या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितलं की, 31 डिसेंबर रोजी सरबजितला नववर्ष साजरं करण्यासाठी हॉटेलमध्ये घेऊन गेलो होतो. मला शंका होती की तिचं दुसऱ्या कोणाशी त

री अफेअर आहे. रात्री तिच्या मोबाइलवर एक कॉल आला. तो त्याच मुलाचा होता ज्याच्यावर मला संशय होता. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला.

सरबजित आणि मनिंदर यांच्यातील वाद विकोपाला गेला. त्यानंतर रागाच्या भरात मनिंदरने सरबजितचा गळा दाबला. त्याचा राग शांत झाला तेव्हा त्याला आपण केलेल्या गुन्ह्याची जाणीव झाली. त्यानंतर तिथून मनिंदर फरार झाला.

अभिनेत्रीच्या मदतीने भारतीय क्रिकेटपटूंना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न

हत्या प्रकरणात पोलिस वॉन्टेड मनिंदरला शोधत होते. त्यातच टीव्हीमध्ये एका शोसाठी तो उपस्थित असल्याचं पाहून पोलिस त्याला अटक करण्यासाठी पोहचले. 2010 मध्येही त्याच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्याला अटक केल्यानंतर शिक्षाही झाली होती.

निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देणाऱ्या जल्लादचं मानधन ऐकून तुम्ही व्हाल चकीत!

 

First published: January 15, 2020, 10:43 AM IST
Tags: Punjab

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading