शोपियाँ चकमकीत 'जैश-ए-मोहम्मद'चा कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा

शोपियाँ चकमकीत 'जैश-ए-मोहम्मद'चा कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ सेक्टरमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली.

  • Share this:

श्रीनगर, 27 जुलै : जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ सेक्टरमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. तर एक जवान जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मुन्ना लाहौरचा खात्मा झाला आहे. 19 वर्षांचा मुन्‍ना लाहोरी आयईडी स्फोटकं तयार करण्यात एक्सपर्ट होता.

(पाहा :VIDEO: दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी; जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर)

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील बोनबाजार परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली होती. यानंतर परिसराला चहुबाजूंनी घेराव घालत शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यास जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आणि दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

(पाहा :बैलांची सुरू होती टक्कर, दारूड्याने केली एंट्री, पुढे काय घडलं पाहा हा VIDEO)

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी राबवलेल्या धडक अभियानाला मोठं यश आलं आहे. सुरक्षा दलाने मनधान जंगलात राबवलेल्या शोध मोहिमेत दहशतवाद्यांचं मोठं घबाड सापडलं. दाट जंगलात जमिनीखाली खोल दडवून ठेवलेला शस्त्रसाठा शोधण्यात पोलिसांना यश आलं. हा शस्त्रसाठा पाहून सुरक्षा दलालाही आश्चर्य वाटलं. काडतूसं, रायफल्स, ग्रेनेड, पिस्तुलं असा मोठा शस्त्रसाठा सुरक्षा दलानं हस्तगत केला. जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराची दहशतवाद्यांविरुद्ध आक्रमक मोहीम सुरू आहे. गेल्या 18 महिन्यांमध्ये तब्बल 357 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलंय अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली. गेल्या सहा महिन्यांममध्ये पाकिस्तानने 1170 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध सर्वच स्तरांमधून मोहीम सुरू केली. धडक कारवाई करणं, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं आणि दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणं अशा प्रत्येक पातळीवर ही मोहीम सुरू आहे.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या गर्भवती महिलेची सुखरूप सुटका, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2019 02:58 PM IST

ताज्या बातम्या