मराठी बातम्या /बातम्या /देश /

अजब सरकारी कारभार! पूर्वजांनी 68 वर्षांपूर्वी प्यायलेल्या पाण्याची पतवंडांकडून वसुली

अजब सरकारी कारभार! पूर्वजांनी 68 वर्षांपूर्वी प्यायलेल्या पाण्याची पतवंडांकडून वसुली

एकीकडे विविध राज्यांमध्ये मोफत वस्तू वाटत स्कूटीदेखील फ्रीमध्ये वाटण्याची घोषणा सरकाराने केली आहे. मिर्झापूरमध्ये मात्र  तब्बल 68 वर्षांपासून हे पाणी पिलेल्या जगाचा निरोप घेतलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 10 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमधील लोकांना पूर्वजांनी पिलेल्या पिण्याच्या पाण्याच्या वसुलीसाठी नगर परिषद नोटीस बजावत आहे. पहिलं कनेक्शन सप्टेंबर 1954 मध्ये विंध्याचलच्या पूर्वेकडील मोहल येथे होतं. 1954 पासूनची पाणीपट्टी वसूल करणारी पालिका ही थकबाकी मानून उत्पन्न वाढविण्यासाठी वसुलीत गुंतली आहे. घरासमोरून पाईपलाईन जात असली तरी पाणी वापरण्यासाठी पाणीपट्टी आणि पाणी दराची तरतूद जुनी असल्याचं त्यांचं मत आहे. आजोबा, पणजोबा यांनी पिलेल्या पाण्याची किंमत नातवंडांकडून वसूल केली जात असल्याची स्थिती आहे.

1920 मध्ये शहराची नगरपालिका झाली आणि 1954 पासून पाणीपुरवठा सुरू झाला. एकीकडे विविध राज्यांमध्ये मोफत वस्तू वाटत स्कूटीदेखील फ्रीमध्ये वाटण्याची घोषणा सरकाराने केली आहे. देशाच्या राजधानीत लॅपटॉप, सायकल आणि मोबाईलसोबतच मोफत वीज उपलब्ध करून दिली जात आहे. मिर्झापूरमध्ये मात्र तब्बल 68 वर्षांपासून हे पाणी पिलेल्या जगाचा निरोप घेतलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. मृतांच्या स्थावर मालमत्तेवर नावं नोंदवलेल्या सुमारे 200 जणांना थकबाकी वसुलीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

आई-वडील असल्याचे सांगून मुलं घेऊन जायची अन् भीक मागायला लावायची, उस्मानाबाद बालसुधारगृहात चाललंय काय?

नागरी सुविधांच्या नावाखाली नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असली तरी पाणी करासोबतच पाण्याचे मूल्य वसूल करण्यासाठी वस्तीत दररोज सर्वेक्षण केले जात आहे. लोकांनी पाण्यासाठीचं बिल भरण्यास सुरुवात केल्यास पालिकेचं उत्पन्न सुमारे 60 ते 70 लाखांनी वाढणार आहे. विभागाकडून होत असलेल्या वसुलीबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

1954 पासून पाण्याचं बिल सुरू झाल्याचं अधिकारी सांगतात. तेव्हापासून घेतलेल्या पाण्याच्या कनेक्शनसाठी तेव्हाचे लोक म्हणजेच आता असलेल्या लोकांचे पूर्वज आजोबा सापडत नाहीत. त्यामुळे आम्ही शेतात जाऊन सर्वेक्षण करत आहोत, आतापर्यंत 300 ते 400 जण सापडले असून त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. यातील बहुतेक लोक सध्या राहिलेले नाहीत. म्हणजेच मरण पावले आहेत, त्यामुळे त्यांच्या संपत्तीवर हक्क असणाऱ्या त्यांच्या परतवांडांकडून 1954 पासूनचं पाणी बिल वसूल केलं जाणार असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं.

First published:

Tags: Drink water, Viral news