आगीमुळे इमारत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. दिल्ली पोलीस आणि दिल्ली अग्निशमन सेवेसोबतच आता एनडीआरएफ देखील मदत आणि बचाव कार्यात सहभागी आहे. डीसीपी (बाह्य जिल्हा) समीर शर्मा यांनी सांगितलं की, दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळ आज संध्याकाळी ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीचे मालक हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इमारतीतून 50 हून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून आणखी काही लोक इमारतीत अडकल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना 4.45 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली त्यानंतर 30 हून अधिक अग्निशामक गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. दिल्लीतील मुंडका येथे लागलेल्या आगीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल खूप दुःखः केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही पश्चिम दिल्लीच्या मुंडका भागातील एका इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि सांगितले की, ते अधिका-यांच्या सतत संपर्कात आहेत. घटनेबद्दल शोक व्यक्त केला. केजरीवाल यांनी ट्विट केले की, "या दुःखद घटनेबद्दल ऐकून धक्का बसला आणि वेदना झाल्या. मी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहे. आमचे शूर अग्निशमन दल आग विझवण्याचा आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्लीतील मुंडका येथील आगीच्या घटनेने दु:ख: राष्ट्रपती राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी शुक्रवारी राजधानीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका इमारतीला लागलेल्या आगीत अनेक लोकांचा मृत्यू झाल्यामुळे खूप दुःख झाले. त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या. राष्ट्रपती म्हणाले की, जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. कोविंद यांनी ट्विट केले की, "दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेने अत्यंत दु:ख झाले आहे. पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे."Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives in the fire in Delhi. The injured would be given Rs. 50,000 : PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) May 13, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.