Home /News /national /

'सगळे मुस्लीम दहशतवादी नाही, आम्हाला लक्ष्य केलं जातंय'; मुलाच्या अटकेनंतर भडकले मुनव्वर राणा

'सगळे मुस्लीम दहशतवादी नाही, आम्हाला लक्ष्य केलं जातंय'; मुलाच्या अटकेनंतर भडकले मुनव्वर राणा

मुनव्वर राणा म्हणाले की, असं ऐकलं होतं की ब्रिटिश खूप वाईट होते, पण भारतात असे लोक आहेत जे ब्रिटिशांपेक्षा वाईट आहेत. केवळ मुस्लिमांनाच लक्ष्य केले जात आहे. मुस्लिमांना शत्रू मानले जात आहे.

    लखनऊ 26 ऑगस्ट : प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा (Munawwar Rana) यांचा मुलगा तबरेज राणा याला बुधवारी संध्याकाळी सहा वाजता रायबरेली पोलिसांनी लखनऊमधून अटक (Tabrez Rana Arrested) केली आहे. जमिन हडपण्याच्या उद्देशानं त्यानं आपल्या चुलत्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी स्वतःवरच गोळी झाडून घेतली होती. मात्र, सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आल्यानं त्याची पोलखोल झाली आणि पोलिसांनी त्याला अटक केली. यानंतर आता मुनव्वर राणांनी उत्तर प्रदेश पोलीस (Uttar Pradesh Police) आणि सरकारवर (Yogi Government) निशाणा साधला आहे. आपल्या मुलाच्या अटकेवर मुनव्वर राणा म्हणाले, की त्यांच्या मुलावर अजामीनपात्र कलम नाही, पण तरीही त्याला अटक करण्यात आली. मुनावर राणा म्हणाले की, त्यांच्या मुलाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले जाऊ शकले असते. परंतु आई, मुलगी आणि बहिणीसमोर त्याला मारहाण करत पोलीस घेऊन गेले. नाव कमावलं पण वसुलीनं गमावलं; पबमध्ये घुसून वसुली करणे पडले पोलिसाला भारी मुनव्वर राणा म्हणाले की, पोलिसच कुठूनही काहीही काढू शकतात. माझ्या पोटातून दोन पोती वाइनही काढू शकतात. ते म्हणाले, की हा त्रास आम्हाला दिला जात आहे. असं ऐकलं होतं की ब्रिटिश खूप वाईट होते, पण भारतात असे लोक आहेत जे ब्रिटिशांपेक्षा वाईट आहेत. पुढे मुनव्वर राणा म्हणाले की, केवळ मुस्लिमांनाच लक्ष्य केले जात आहे. मुस्लिमांना शत्रू मानले जात आहे. त्यांच्या नजरेत प्रत्येक मुस्लिम दहशतवादी आहे. न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे का असा केला असता, ते म्हणाले की जर न्यायालय न्याय देण्यास सुरुवात केली तर हत्यारे आणि गुन्हेगार मंत्री बनून आपल्यावरील गुन्हे मागे कसे घेऊ शकतील. ही प्रकरणं न्यायालयच संपवतं. मात्र देव त्यांना माफ करत नाही. Drug case मध्ये अडकला 'भल्लालदेव'; राणा दग्गुबाती, रकुलप्रीत सिंहची आता चौकशी] काय आहे घटना - 28 जूनला रायबरेलीमध्ये तबरेज यांच्यावर काही लोकांनी गोळीबार केला होता. या घटनेत तरबेजचा जीव वाचला होता. हा हल्ला त्यावेळी झाला जेव्हा तरबेज आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेला. याचदरम्यान तरबेजवर दोन राऊंड फायरिंग झाली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Muslim, Uttar pradesh

    पुढील बातम्या