पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी - उद्धव ठाकरे

इस्लामाबादेत भारतीय उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत येणाऱ्या पाहुण्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारातच अडवून धमकावल्याची घटना शनिवारी (1 जून) घडली. या प्रकारावर सामना संपादकीयमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 06:50 AM IST

पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी - उद्धव ठाकरे

मुंबई, 4 जून : पाकिस्तानातील इस्लामाबादेत भारतीय उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत येणाऱ्या  पाहुण्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारातच अडवून धमकावल्याची घटना शनिवारी (1 जून) घडली. या प्रकारावर सामना संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'पाकिस्तानला नेतृत्व नाही, दिशा नाही म्हणून इस्लामाबादला शनिवारी घडले तसे प्रकार घडतात. दिल्लीतील पाक उच्चायुक्तांच्या इफ्तार पार्टीवर हिंदुस्थान सरकारने नियंत्रण आणले. कारण त्या पार्टीत कश्मीरातील फुटीरतावाद्यांसाठी पायघड्या घातल्या होत्या. हिंदुस्थानच्या सार्वभौम स्वातंत्र्यास आव्हान देणाऱ्यांना पाक उच्चायुक्त शिरकुर्मा खिलवणार असतील तर त्यांना रोखावे लागेल, पण इस्लामाबादमधील हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी असे काहीच केले नव्हते. म्हणूनच आम्ही म्हणतो, पाकिस्तानी माकडांनी दारू पिऊन तमाशा केला. सरकारने हा तमाशा विसरू नये', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.

(पाहा :SPECIAL REPORT : ममतादीदी 'बॅक इन अ‍ॅक्शन', भाजप कार्यालयाचा घेतला ताबा)

नेमके काय आहे आजचे सामना संपादकीय?

- पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी झाली आहे. इस्लामाबादेत हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत या झिंगलेल्या माकडांनी घातलेला गोंधळ असह्य आहे. इस्लामाबाद येथे शनिवारी संध्याकाळी ही इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी आलेल्या पाहुण्यांसोबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी असभ्य वर्तन केले.

(पाहा :SPECIAL REPORT : निधी चौधरींची बदली की बढती?)

Loading...

- निमंत्रित पाहुण्यांना हॉटेलच्या प्रवेशद्वारावरच रोखले. अनेकांना धमकावून परत पाठवले. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर मोदी सरकारने मुजोर पाकडय़ांची नांगी ठेचलीच आहे, पण शेपूट अजूनही वळवळत आहे. त्या शेपटाचाही बंदोबस्त आता करावा लागेल.

-इम्रान यांनी मोदी यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या, तसेच दोन देशांनी मिळून विकास आणि शांततेवर काम करावे अशी भावनाही म्हणे त्यांनी व्यक्त केली. मात्र प्रत्यक्षात शनिवारी इस्लामाबादेतील इफ्तार पार्टीप्रसंगी जे घडवले गेले ते शांतता प्रक्रियेसाठी टाकलेले पाऊल मानावे काय? पाकिस्तानचे ढोंग पुन्हा उघडे पडले आहे.

- पाकिस्तान कोणतीही चर्चा करण्याच्या लायकीचा देश नाही. हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीस जे निमंत्रित होते ते सर्व इस्लामाबादमधील ‘जानेमाने’ लोक होते. ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत, कलावंत व प्रशासकीय अधिकारी यांचा त्यात समावेश होता. मुख्य म्हणजे हे सर्व पाक नागरिक होते. या इफ्तार पार्टीस मसूद अजहरछाप लोकांना बोलावले नाही याचा संताप बहुधा पाकला आला असावा. या सर्व निमंत्रितांना हॉटेलात शिरण्यापासून रोखले गेले. इतकेच नाही, तर अत्यंत अपमानास्पद पद्धतीने त्यांची झडती घेण्यात आली.

(पाहा :SPECIAL REPORT : शिवरायांबद्दल वादग्रस्त टि्वट करण्याचा पायलचा हेतू काय?)

- दहशतवादविरोधी पथकाने कार्यक्रमस्थळी घेराव घातला व प्रत्येक निमंत्रितास तो जणू दहशतवादीच आहे अशा पद्धतीचे वर्तन केले गेले. पाकिस्तानात जे खरे दहशतवादी आहेत ते यांचे लाडके. त्यांच्या बाबतीत पाकचे दहशतवादविरोधी पथक कमालीचे नरम असते, पण हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी आयोजित इफ्तार पार्टीबाबत मात्र ते भलतेच गरम दिसले.

-  पाकिस्तानच्या बाबतीत चीनही आज कुंपणावर आहे हे अजहर मसूद प्रकरणात दिसून आले. कर्जाच्या डोंगराखाली पाकिस्तान चिरडून गेला आहे व दहशतवाद्यांच्या नंग्या नाचामुळे तिथे एक प्रकारे अराजक निर्माण झाले आहे. पाकिस्तान हा देश नसून जागतिक दहशतवादाची ‘फॅक्टरी’ बनली आहे. आयएसआय व पाकिस्तानी लष्कर मिळून पाकिस्तानवर नियंत्रण ठेवत आहेत. इम्रान खान हे लोकशाही मार्गाने निवडून आलेले पंतप्रधान आहेत हा भ्रम आहे.

- दिल्लीतील पाक उच्चायुक्तांच्या इफ्तार पार्टीवर हिंदुस्थान सरकारने नियंत्रण आणले. कारण त्या पार्टीत कश्मीरातील फुटीरतावाद्यांसाठी पायघडय़ा घातल्या होत्या. हिंदुस्थानच्या सार्वभौम स्वातंत्र्यास आव्हान देणाऱ्यांना पाक उच्चायुक्त दिल्लीत बोलावून शिरकुर्मा खिलवणार असतील तर त्यांना रोखावे लागेल, पण इस्लामाबादमधील हिंदुस्थानी उच्चायुक्तांनी असे काहीच केले नव्हते. म्हणूनच आम्ही म्हणतो, पाकिस्तानी माकडांनी दारू पिऊन तमाशा केला. सरकारने हा तमाशा विसरू नये.

SPECIAL REPORT : मोदी सरकारचं पुन्हा एकदा 'मंदिर वही बनायेंगे'!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 06:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...