शेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला

शेअर बाजारात भूकंप, सेंसेक्स 1100 अंकांनी कोसळला

मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी दुपारी भूकंप आला. शेअर बाजार अचानक 1100 अंकांनी कोसळल्याने गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. नंतर बाजार थोडा सावरला.

  • Share this:

मुंबई, ता. 21 सप्टेंबर : मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी दुपारी भूकंप आला. शेअर बाजार अचानक 1100 पेक्षा जास्त अंकांनी कोसळल्याने गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. 21 मिनिटांमध्ये सेंसेक्स 1153 अंकांनी घसरल्याने सगळ्यांनाच धक्का बसला काही बॉन्ड संदर्भात उलट सुलट बातम्या आल्याने संशयाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळं सेंसेक्स कोसळल्याची माहिती आर्थिक विश्लेषकांनी दिली आहे. हा तात्पुरता परिणाम असून या काळात चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेता येवू शकतात असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

या घसरणीचा बँकिंग क्षेत्रातील शेअर्सना जोरदार फटका बसला आहे. शुक्रवारी सकाळी जेव्हा शेअर बाजार उघडला तेव्हा उत्साहाचं वातावरण होतं. व्यवहारही जोमात होते मात्र नंतरच्या आपटीने सगळ्यांमध्येच धास्ती निर्माण झाली. मात्र दुपारच्या पडझडीनंतर सेंसेक्स काही अंकांनी वधारला त्यामुळे गुंतवणूकदारांना थोडा दिलासा मिळाला.

आंतरराष्ट्रीय बाजारातली अस्थिरता, रूपयाचं सातत्यानं होणारं अवमूल्यन, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातला चढउतार यामुळं जगभरातल्याच शेअर बाजारांमध्ये होत असलेले चढउतार यामुळे असे प्रकार घडत असतात. पण एकूण परिस्थिती समाधानकारक असल्याने चिंता करण्याचं कारण नाही असंही मत अर्थ विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

अनेक बँका आणि म्युच्युअल फंड कंपन्यांनी तातडीनं स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडत गुंतवणूकदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. गृहकर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही मोठी घसरण बघायला मिळाली होती त्यामुळे त्या क्षेत्रातल्या कंपन्यांनीही खुलासे करत आर्थिक स्थिती भक्कम असल्याचं स्पष्ट केलं. काही मिनिटांच्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं काही लाख कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

VIRAL VIDEO : डान्सिंग अंकल आठवतायेत.. मग हे डुप्लिकेट मनोज कुमार बघाच!

 

First published: September 21, 2018, 3:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading