'बुरखा बंदी'च्या मागणीवरून संजय राऊतांची माघार, 'सामना'तून सारवासारव

'बुरखा बंदी'च्या मागणीवरून संजय राऊतांची माघार, 'सामना'तून सारवासारव

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'रोखठोक' सदरात सपशेल माघार घेत बुरखा बंदीची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नसल्याचं जाहीर केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 5 मे : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 'सामना संपादकीय'मधून देशातही 'बुरखा बंदी'ची मागणी केली होती. या मागणीवर चौफर टीका झाल्यानंतर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. बुरखा बंदीसंदर्भात त्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे शिवसेना पक्षातच वादळ निर्माण झालं होतं. याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नाराजीला संजय राऊत यांना सामोरं जावं लागलं. यानंतर शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी बूरखा बंदी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे शिवसेनेत एकटे पडलेल्या संजय राऊत यांनी सामनातील 'रोखठोक' सदरात सपशेल माघार घेत, बुरखा बंदीची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नसल्याचं जाहीर केलं आहे. तसेच बुरखा बंदीची भूमिका ही केवळ सामाजिक जाणीवेतून केल्याची सारवासारवही त्यांनी 'रोखठोख'मधून केली आहे.

वाचा :शिवसेनेत भूकंप, उद्धव ठाकरे संजय राऊतांवर नाराज

संजय राऊत यांचं 'रोखठोक'मध्ये स्पष्टीकरण

- ऐन निवडणुकीत दोन गोष्टींचे राजकारण झाले. मसूद अझरला जागतिक दहशतवादी असल्याचे ‘युनो’ने घोषित करताच येथे काँग्रेससारख्या पक्षाने फारसा आनंद व्यक्त केला नाही. मसूदवरील विजयामुळे हिंदू मते मोठ्या प्रमाणात मोदींकडे वळतील ही त्यांची भीती. दुसरी गोष्ट श्रीलंकेतील ‘बुरखाबंदी’ निर्णयाची.

- बुरखाबंदीची जितकी चर्चा श्रीलंकेत झाली नाही त्यापेक्षा जास्त चर्चा आपल्या देशात झाली. येथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, ‘बुरखाबंदी’ची मागणी शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांनी केली नाही. श्रीलंकेतील घडामोडींवर एक विश्लेषण ‘सामना’ने छापले इतकाच हा विषय.

- तिहेरी तलाकबाबतही शिवसेनेची भूमिका सामाजिक सुधारणेची जास्त व धार्मिक कमी अशीच आहे.

- हिंदू समाजातील सती, हुंडा प्रथा, बालविवाह यावरही शिवसेनेने ठोस भूमिका घेतल्या व त्या भूमिका प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून आहेत.

वाचा :संजय राऊतांनी मानले मुस्लिम भगिनींचे मानले आभार, हे आहे कारण

वाचा : हिंदुस्थानातही 'बुरखा' तसेच 'नकाब' बंदी करावी, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

1 मे रोजीच्या सामना संपादकीयमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदीची मागणी करण्यात आली होती.  ''फेस मास्क किंवा इतर साधनांनी चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य ठरेल, असे जाहीर करून श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस व धैर्याचे दर्शन घडवले. रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? '', अशी विचारणा पंतप्रधान मोदींकडे करण्यात आली होती.

सामना संपादकीयमध्ये बुरखा बंदीची मागणी

- भीषण बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत बुरखा आणि नकाबसह चेहरा झाकणार्‍या प्रत्येक गोष्टीवर बंदी घालण्यात आली आहे.

- राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांनी जाहीर केले. आम्ही या निर्णयाचे स्वागत करीत आहोत व पंतप्रधान मोदी यांनीही श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’ बंदी करावी, अशी मागणी राष्ट्रहितासाठी करीत आहोत.

- बुरख्यांचा वापर करून देशद्रोह, दहशतवाद घडवला जात असल्याची उदाहरणे समोर आली.

धर्मांधता व त्यांच्यातील रूढी, परंपरा राष्ट्रीय सुरक्षेच्या आड येत असतील तर त्या मोडून काढल्या पाहिजेत. मोदी यांनी हे सर्व करून घेतले पाहिजे. सर्जिकल स्ट्राइकइतकेच हे कार्य धाडसाचे आहे.

VIDEO: 'त्या' बोल्ड दृश्याबद्दल प्रिया बापटनं अखेर मौन सोडलं

First published: May 5, 2019, 9:24 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading